किरण राव ही राजघराण्यातील स्त्री – तिच्याबद्दल ...

किरण राव ही राजघराण्यातील स्त्री – तिच्याबद्दल १० खास गोष्टी (Kiran Rao Belongs To The Royal Family, Is The Sister Of This Famous Actress – Know 10 Special Things.)

बॉलिवूडमधील सर्वाधिक पसंतीची जोडी आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रत्येक न्यूज चॅनेलपासून सोशल साइट्सवर देखील त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने कल्लोळ माजवला आहे. उभयतांनी खरं तर संयुक्त निवेदनातून आपण एकमेकांच्या सहमतीने हा निर्णय घेत असल्याचे सांगितले आहे, परंतु लोकांच्या समाधानाकरिता एवढंच कारण पुरेसं नसल्याचे चित्र सध्या दिसतंय. असो. आमिर खानबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे, आज आपण किरण रावबाबत काही गोष्टी जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरण राव ही कोणत्या साधारण कुटुंबातील नसून राजघराण्यातील स्त्री आहे. तसेच किरण राव, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीची चूलत बहीण आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जाणून घेऊया किरण रावबद्दलच्या न ऐकलेल्या गोष्टी –

१. किरण रावचा जन्म ७ नोव्हेंबर १९७३ रोजी तेलंगना (आंध्र प्रदेश) मध्ये झाला.

२. किरण राव राजघराण्यातील स्त्री आहे, तिचे आजोबा रामेश्वर राव हे तेलंगनातील महबूबनगरच्या वानापर्थीचे राजा होते.

३. किरण रावचे बालपण कोलकातामध्ये गेले, तेथील लॉरेटो हाऊसमध्ये तिने आपले प्राथमिक शिक्षण घेतले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

४. सोफिया कॉलेज ऑफ वुमन येथून किरण रावने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून मास्टर्स डिग्री मिळवली.

५. आता ती लेखिका, चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून सुपरिचीत आहे.

६. ‘लगान’ चित्रपटापासून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून किरण रावने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. करिअरच्या या पहिल्याच चित्रपटाने तिला अमाप यश मिळवून दिले. 

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

७. ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर किरण रावची आमिर खानसोबत पहिल्यांदा भेट झाली. शुटिंग दरम्यान त्यांचं सूत जुळलं आणि काही वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर २००५ साली दोघांनी लग्न केलं.

८. ‘धोबी घाट’ हा किरण रावचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. आज किरणने आपलं काम आणि मेहनतीने चित्रसृष्टीमध्ये स्वतंत्र ओळख बनवली आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

९. किरण रावने  ‘जाने तू… या जाने ना’, ‘धोबी घाट’, ‘दंगल’, ‘तलाश’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘पिपली लाइव्ह’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

१०. आमिर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ देखील किरण राव प्रोड्यूस करत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

केवळ आमिर खानची पत्नी इतकीच किरण रावची ओळख नाही. किरणने आपल्या मेहनतीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. किरण एक यशस्वी निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. किरण ही बॉलिवूड स्टार्स वाईफमधील सर्वात यशस्वी महिला आहे. बक्कळ कमाई करण्याबरोबरच किरण अनेक स्वयंसेवी संस्थांशीही संबंधित आहे. इतकं यशस्वी आयुष्य असतानाही दोघांनी अचानक विभक्त होण्याचा निर्णय घेऊन चाहत्यांना बुचकाळ्यात पाडले आहे. तुम्हाला काय वाटतं, यांच्या घटस्फोटामागचं कारण काय असू शकतं?