कियारा अडवाणीचे हे स्टाइल लुकबुक बघा : इंडियन त...

कियारा अडवाणीचे हे स्टाइल लुकबुक बघा : इंडियन ते इंडो-वेस्टर्न, तिच्या कपडेपटात सगळंच आहे फॅशनेबल (Kiara Advani’s Style Lookbook: From Indian To Ultra Modern, See Kiara’s Classy And Fashionable Wardrobe)

कियारा अडवाणी जितकी गुणी आणि सुंदर आहे, तितकीच स्टायलिश आणि अभिरुची संपन्न देखील आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचे कपडे शोभून दिसतात. अगदी इंडियन, वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न…

तिच्या कपडेपटात सर्वच स्टाइल्स गुण्यागोविंदाने नांदत आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, तिचं स्टायलिश लुकबुक! त्यामध्ये साडीपासून ते जम्पसूट आणि स्टायलिश ड्रेसेस आहेत!

कियाराचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. तिचे हे चाहते तिच्या प्रत्येक स्टाइल आणि लूक्सवर फिदा असतात. कियाराचं वैशिष्ट्य असं की, ती बिकिनी घालून देखील फारच सुंदर दिसते. आपल्या कोणत्याही आविर्भावात ती कधीच वाईट किंवा बीभत्स वाटलेली नाही.