कियारा अडवाणीने स्वत:च्या अंधश्रद्धेबद्दल केला ...

कियारा अडवाणीने स्वत:च्या अंधश्रद्धेबद्दल केला खुलासा (Kiara Advani Superstitious Reveal Truth In Kapil Sharma Show)

बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी फारच कमी वेळेत मनोरंजन सृष्टीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी  (Kiara Advani) होय. कियारा अडवाणी सध्या तिच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच ती ‘शेरशाह’ फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत अफेअर आणि नंतर ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती. दरम्यान आता ती तिच्या आगामी ‘भूल भुलैया २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि चित्रपटाच्या टीमसोबत ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर ती पोहोचली होती. तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन, राजपाल यादव, दिग्दर्शक अनीझ बझ्मी देखील उपस्थित होते. कपिलनं संपूर्ण टीमसोबत खूप मस्ती केली होती. त्यानंतर कपिल शर्मानं कियाराला विचारलं की,” ती अंधश्रद्धाळू आहे का?” त्यावर कियारा काय म्हणाली ते ऐकणं सगळ्यात महत्त्वाचं ठरेल. जिथे अभिनेत्रीने सांगितले की ती एका गोष्टीबाबत अंधश्रद्धाळू आहे.

कियारा अडवाणी म्हणाली,”मी पूर्ण अंधश्रद्धाळू मुळीच नाही. हो,पण एका गोष्टीच्या बाबतीत मात्र मी अंधश्रद्धाळू बनते. मी जोपर्यंत एखादा सिनेमा साइन करत नाही तोपर्यंत मी त्याविषयी कोणालाच सांगत नाही”. हे ऐकून सगळे हैराण झाले. पण शोची जज अर्चना पुराण सिंगने मात्र तिचं यासाठी कौतूक केलं. कियारा पुढे म्हणाली,”मी जर सिनेमा साइन करण्याआधी कोणाला सांगितले तर तो माझ्या हातातून जाईल असं मला उगाचच वाटत राहतं”.

अभिनेत्री कियारा आडवाणी ‘कबीर सिंह’ आणि ‘शेरशाह’सारख्या चित्रपटांमुळे खास प्रसिद्धीत आली होती. त्यांनतर अभिनेत्रींच्या हातात अनेक चांगले प्रोजेक्टस आहेत. ‘भूल भुलैया २’ हा प्रियदर्शनच्या २००७ मध्ये आलेल्या याच नावाच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘भूल भुलैया’ या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी आहुजा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. ‘भूल भुलैया २’ २० मे रोजी रिलीज होणार आहे.