कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने होळीनिम...

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने होळीनिमित्त शेअर केले त्यांच्या हळदीतील काही अनसीन फोटो ( Kiara Advani, Sidharth Malhotra Share unseen haldi photos to wish fans on Holi)

आज सर्वात देशभरात होळीचा सण साजरा केला जात आहे. सर्वजण होळीच्या रंगांमध्ये न्हावून निघाले आहेत. अशातच अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या चाहत्यांना अनोख्या अंदाज होळीच्या शुभेच्छा दिल्या. या जोडप्याने होळीच्या निमित्ताने आपल्या हळदी समारंभातील काही अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी अनोख्या अंदाजात आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या हळदी समारंभाचे फोटो शेअर करत चाहत्यांना अनोखी ट्रीट दिली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर सध्या वाऱ्यासारखे पसरत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा ने तीन फोटो पोस्ट केले आहेत.

याबद्दल मध्ये दोघांनीही केशरी रंगाचा करता कुर्ता घातलेला पाहायला मिळतो. दोघेही एकमेकांना अगदी पूरक दिसत आहेत. फोटोत दोघेही एकमेकांना प्रेमाने हळद लावत आहेत. शेअर केलेल्या फोटोला कियाराने कॅप्शन दिले की, मेरी और मेरी प्यार की तरफ से आपको और आपके अपनों को होली मुबारक. हे फोटो पोस्ट झाल्यावर लगेचच या जोडप्याचे चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. होळीच्या शुभेच्छा देत एका युजरने लिहिले की, हैप्पी होली सीड अँड कियारा, तर एकाने लिहिले तुमची जोडी खूप सुंदर आहे.