अभिनेत्री कियारा अडवाणीने सासरच्या जबाबदाऱ्यांब...

अभिनेत्री कियारा अडवाणीने सासरच्या जबाबदाऱ्यांबद्दल केले मोठे वक्तव्य, सोबतच सिद्धार्थ मल्होत्रा पती म्हणून कसा वागतो याबद्दल केला खुलासा( Kiara Advani revealed which kind of husband is Siddharth Malhotra, send this about responsibility of her in- law)

बॉलिवूडची नववधू अभिनेत्री कियारा अडवाणी लग्नानंतर लगेचच तिच्या व्यवसायिक कमिटमेंट पूर्ण करण्यास परतली. पण सोबतच ती तिच्या सासरकडच्या जबाबदाऱ्या देखील पार पाडत आहे. कियारा सासरी एक बहुगुणी सून होण्यासोबतच उत्तम पत्नी असल्याचे कर्तव्य देखील निभावत आहे.

नुकतेच एका मुलाखत कियाराने लग्नानंतर सिद्धार्थ सोबत चा पती-पत्नीचा प्रवास कसा आहे तसेच सिद्धार्थ एक नवरा म्हणून कसा आहे व आपल्या सासरच्या जबाबदाऱ्यांबद्दल अनेक खुलासे केले.७ फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकलेल्या कियारा व सिद्धार्थच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला. सिद्धार्थ सोबत लग्न झाल्यावर आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप बदल झाल्याचे कियाराने कबूल केले.

अभिनेत्रीने सांगितलेली लग्नानंतर ती पहिल्यांदाच घर एकटीने सांभाळत असून रोज नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. मुलाखतीत कियाराने सांगितले की, मी पहिल्यांदा घर सांभाळत आहे. जेव्हा मी माझ्या आई-वडिलांसोबत राहायचे तेव्हा मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पडताना पाहिले आहे. आता इथे सासरे मी माझ्या आईप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व खूप छान आहे, मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आनंदाने घालवत आहे त्यामुळेच मी खूप खुश आहे.

पती सिद्धार्थ बद्दल सांगताना कियारा म्हणाली की, तो सगळ्यांचाच खूप मान ठेवतो आणि लोकांशी नम्रपणांने वागतो. सिद्धार्थ खूप योग्य आणि चांगला जीवनसाथी आहे. तो नेहमीच मला प्रोत्साहन देत असतो, मग ते काही काम असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखादी नवीन गोष्ट करून पाहणे असो. तो नेहमीच मला नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरित करत असतो.सिद्धार्थ आणि कियारा लग्नानंतरचे आपले आयुष्य खूप आनंदाने घालवत आहेत. त्यांच्या प्रेम कहाणी बद्दल बोलायचे झाल्यास त्यांची पहिली ओळख शेरशहा या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांची मैत्री झाली, त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढत जाऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कियाराने हे देखील सांगितले की लग्नानंतर सुद्धा आमच्यातील मैत्री कायम आहे. आमचे हेच बॉण्डिंग प्रेक्षकांना नेहमी आवडते. शेरशहा चित्रपटात आम्हाला एकमेकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुढे सुद्धा आम्हाला एकत्र काम करायला नक्कीच आवडेल. एखादी चांगली स्क्रिप्ट लवकरच मिळेल अशी आशा आहे, जी दोघांनाही आवडेल. आणि त्या मार्फत आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करू.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी गेल्या महिन्यात सात फेब्रुवारीला राजस्थान मधील जैसलमेर येथे शाही विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, लवकरच कियारा सत्य प्रेम की कथा या चित्रपटात कार्तिकाऱ्यांसोबत दिसणार आहे तर सिद्धार्थ सर्वात शेवटी मिशन मजनू या चित्रपटात रश्मिका मंदानासोबत दिसला होता.