कियाराच्या एका चाहत्याने तिला भेटण्यासाठी केला ...

कियाराच्या एका चाहत्याने तिला भेटण्यासाठी केला हा वेडेपणा (Kiara Advani Recalls ‘Sweet But Crazy And Scary’ Moment When Her Fan Reached Her Home Unannounced)

सध्याच्या काळात सर्वात आघाडीची अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी. ती सुंदर तर आहेच पण तिच्या अभिनय कौशल्याने तिने अनेकांची मनेही जिंकली आहेत. सध्या तिचे भूलभूलैया 2 आणि जुग जुग जियो हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत आहेत. कियाराच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते झुरत असतात. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कियाराने तिच्या सोबत घडलेला एक किस्सा सांगितला.

चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांसाठी कोणत्याही थराला जातात. त्या पाठीमागे जरी त्यांचे प्रेम भावना असली तरी काही वेळेस कलाकारांना त्यामुळे घाबरायला होते. असेच काहीसे कियाराच्या बाबतीत घडले होते.

कियारा तो किस्सा सांगताना म्हणाली की, मी कोणत्या मजल्यावर राहते हे सांगणार नाही पण मी खूप वरच्या मजल्यावर राहते. माझा एक चाहता केवळ मला भेटायला तेवढे मजले चढून माझ्या घरी आला होता. मी जेव्हा त्याला बघितले तेव्हा मी एका क्षणासाठी खूप घाबरले कारण तो घामाने अगदी चिंब झाला होता. तेव्हा मी त्याला पाणी हवे का  ? तू कसा आहेस? तू बसणार का?  असे प्रश्न विचारले पण त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याने मला ‘नाही’ अशीच दिली. या उलट तो म्हणाला की तु माझ्यासाठी खूप काही आहेस. तेव्हा कियारा म्हणाली हे सांगायला तू लिफ्टने पण येऊ शकत होतास. पण पुन्हा माझ्या घरी येऊ नकोस. तो भलेही खूप चांगला होता पण त्याचे वागणे खूप भयानक होते. तो माझा खूप चांगला चाहता होता.

कियारा मुंबईतील महालक्ष्मी येथील एका इमारतीत 51 व्या मजल्यावर राहते. कियाराचा चाहता 51 मजले चढून तिच्या घरी तिला भेटायला गेला होता.