कियारा अडवाणीने शेअर केले पारदर्शक कपड्यांमधले ...

कियारा अडवाणीने शेअर केले पारदर्शक कपड्यांमधले बोल्ड फोटो (Kiara Advani Looks Smoking Hot As She Shares A New Picture In Beautiful Sheer Black Gown)

अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती लवकरच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न करणार आहे. आतापर्यंत दोघांनी कधीच आपल्या नात्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी ते अनेकदा पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात.

कियाराने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिने फोटो पोस्ट करताच तो झपाट्याने व्हायरल झाला. कियाराचे चाहते या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.या फोटोमध्ये कियाराने काळ्या रंगाचा गाऊन घातला आहे. हा ऑफ शोल्डर गाउन खूपच तिच्यावर खूप सेक्सी दिसत आहे.

फोटोत कियारा खूप हॉट दिसत आहे. डीप नेकलाइन असलेला हा लांब गाऊन अगदी पारदर्शक आहे. या सी थ्रू गाउनमध्ये नॉन-शीअर जाड स्टिप्स आहेत. कियाराने डोळे मिटून एक मादक पोज दिली असून ती खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने केस मोकळे सोडले असून चेहऱ्यावर सुध्दा कमीत कमी मेकअप केला आहे.

चाहत्यांना हा फोटो खूप आवडला असून कियारा एखाद्या परीसारखी दिसत असल्याची कमेंट युजर्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये तुझ्या फोटोकडे सारखे पाहतच राहावे असे वाटते असं लिहिलं आहे. तर एकाने तिला तू कोणत्या देशातली परी आहेस असे विचारले आहे.

काही चाहते कमेंट बॉक्समध्ये फायर आणि हार्टचे इमोजी पोस्ट करून अभिनेत्रीला सुंदर म्हणत आहेत.कियारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत सत्य प्रेम की कथा आणि विकी कौशलसोबत गोविंदा नाम मेरा या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.