प्रियकराने फसवणूक केली तर त्याला माफी नाही: किय...

प्रियकराने फसवणूक केली तर त्याला माफी नाही: कियारा अडवाणीची स्पष्टोक्ती ! (Kiara Advani Has Given This Threat On The Deception Of Boyfriend, Will Not Tolerate This Act Of Lover)

अभिनेत्री कियारा अडवाणी सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे देऊन तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सिद्धार्थ कपूरला डेट करत असल्याच्या बातम्यांमुळे सुद्धा चर्चेत असते. कियारा आणि सिद्धार्थने अद्याप या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. पण कियाराने आपल्या बॉयफ्रेंड संबंधित एक धक्कादायक विधान केले आहे.

कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते. मात्र त्यांच्याकडून याबाबतीत कोणत्याही प्रकारचा खुलासा आलेला नाही. पण तरी ती प्रेमासंबंधी किती गंभीर आहे ते तिच्या एका वाक्यातून समजले. एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, तुझ्या प्रियकराकडून फसवणूक झाल्यास तुझी प्रतिक्रिया काय असेल?

यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली,मी त्याला ब्लॉक करेन आणि कधीही मागे वळून पाहणार नाही. विसरण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. अशा रिलेशनशिपमध्ये माझा पूर्णपणे नकार असेल. यावरुन हे स्पष्ट होते की, जर तो प्रियकर सिद्धार्थ असेल आणि त्याने असे काही केले तर कियारा या नात्याला दुसरी संधी देणार नाही.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या 7 व्या सीझनमध्ये कियारा शाहिद कपूरसोबत आली होती.तेव्हा करणने तिला सिद्धार्थबद्दल एक प्रश्न विचारला की, तू सिद्धार्थला डेट करत आहेस का? त्यावेळी कियाराने हो किंवा नाही यापैकी काहीच उत्तर दिले नाही.

त्यानंतर करणने तिला तुम्ही जवळचे मित्र आहात का ? असा प्रश्न विचारला यावर तिने जवळच्या मित्रांपेक्षा जास्त आहे असे उत्तर दिले. यावर शाहिदने कियारा आणि सिद्धार्थला सुंदर कपल अशी उपमा दिली.  

इतकंच नाही तर कॉफी विथ करणच्या ७व्या सीझनमध्ये सिद्धार्थनेही हजेरी लावली होती. तेव्हा करणने त्याची सुद्धा खूप मजा घेतली. करणने सिद्धार्थला थेट विचारले की तू कियारा अडवाणीला डेट करत आहेस का ? तुमच्या भविष्यातील काही योजना आहेत का? तू कियारा अडवाणीशी लग्न करशील का?

यावर सिद्धार्थने केवळ “उज्ज्वल आणि आनंदी भविष्य.” एवढेच उत्तर दिले. सिद्धार्थच्या या उत्तराला जोडून करणने कियारा अडवाणीसोबत का? असा प्रश्न विचारला, त्यावर सिद्धार्थने  “ती असेल तर खूप छान होईल.” असे उत्तर दिले.