कियारा अडवाणीचे, अशोक कुमार यांच्याशी काय नातं ...

कियारा अडवाणीचे, अशोक कुमार यांच्याशी काय नातं आहे? माहीत आहे का तुम्हाला? (Kiara Advani Has A Special Relationship With Ashok Kumar, Do You Know?)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी हिचे दिवंगत दिग्गज अभिनेता अशोक कुमार यांच्याशी एक खास नाते आहे. ते ऐेकून तुम्ही चकित व्हाल.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कियाराचा जन्म १९६२ सालचा. तिचं खरं नाव कियारा नसून आलिया अडवाणी आहे. पण कियाराने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा आलिया भट्ट मोठी स्टार बनली होती. तेव्हा दोन आलियांमध्ये गोंधळ वाढला असता. म्हणून तिने आपले आलिया हे नाव बदलून कियारा हे नवे नाव घेतले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कियाराचे वडील बिझनेसमन आहेत. त्यांचं नाव जगदीश अडवाणी आहे. तर तिची आई शिक्षिका आहे. तिचं नाव जेनेलीन जाफरी आहे. त्यामुळे कियाराचे बॉलिवूडमध्ये काही कनेक्शन नाही, असे लोकांना वाटते. प्रत्यक्षात मात्र कियारा, अशोक कुमार यांच्या नात्यात लागते. कशी ते पाहा…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कियाराची आई जेनेलीनची सावत्र आई भारती गांगुली होती, ती अशोक कुमार यांची मुलगी होती. त्यामुळे अशोक कुमार हे कियाराचे पणजोबा लागतात.

भूल भुलैया २, गोविंदा मेरा नाम, जुग जुग जियो हे कियाराचे आगामी चित्रपट आहेत. तिनं २०१४ साली आलेल्या ‘फगली’ या चित्रपटातून पदार्पण केले आहे.