कियारा नववधूप्रमाणे राहत नाही म्हणून नेटकऱ्यांन...

कियारा नववधूप्रमाणे राहत नाही म्हणून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले कोण बोलेल हिचं नुकतंच लग्न झालयं (Kiara Advani Gets Brutally Trolled For Not Looking Like A Newlywed, ‘Kon Kahega Abhi Shadi Hui Hai’)

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. कियारा अडवाणीने 7 फेब्रुवारी 2023 रोजी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर नुकतीच कियारा एका अवॉर्ड शोमध्ये दिसली होती. त्यावेळी तिने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. पण लग्नानंतरचा हा तिला लूक सोशल मीडिया युजर्सना अजिबात आवडला नाही.

अभिनेत्री कियारा अडवाणी झी सिने अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर चालताना दिसली. ऑफ-शोल्डर रेड कॉर्सेट गाऊनमध्ये कियारा अतिशय सुंदर दिसत होती.

अभिनेत्रीने लॉन्ग टेल गाउनस थाई हाय स्लिट तसेच मोकळे केस असा लूक केला होता. चेहऱ्यावर हलका मेकअप आणि कोणतेही दागिने न घालता ती खूप मनमोहक दिसत होती. कियारा आपली साखरपुड्याची डायमंडची अंगठी फ्लॉंट करताना दिसली.

झी सिने अवॉर्ड्समध्ये कियाराचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूप आवडला. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिच्या लूकची जोरदार प्रशंसा केली.

पण सोशल मीडियावर काही युजर्सना लग्नानंतर अभिनेत्रीची ही स्टाइल आवडली नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला वाईट पद्धतीने ट्रोल करण्यास सुरुवात केली.

लग्नानंतर डोक्यावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र न घातल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल करताना एका युजरने लिहिले की, ‘हे लोक सामान्य लोकांपेक्षा किती वेगळे आहेत, कोण म्हणेल हिचे नुकतेच लग्न झाले आहे.’

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचे लग्न हे बहुप्रतिक्षित सेलिब्रिटी लग्नांपैकी एक होते.

त्यांच्या लग्नाला केवळ काही जवळील मित्रमंडळी तसेच कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते.