कियारा अडवाणी शालेय दिवसात पडली होती प्रेमात, प...

कियारा अडवाणी शालेय दिवसात पडली होती प्रेमात, पण दबावाखाली येऊन केला ब्रेकअप (Kiara Advani Fell in Love in School, Under This Pressure Actress Broke Up With Him)

बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कियाराचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघांनीही अद्याप आपले नाते अधिकृतपणे सांगितलेले नाही. 

सिद्धार्थच्या प्रेमात पडायच्या आधी कियारा आपल्या शालेय दिवसांमध्ये प्रेमात पडली होती, पण दबावामुळे अभिनेत्रीने प्रियकरासोबत ब्रेकअप केले होते.

अभिनेत्री कियारा अडवाणी शाळेत शिकत असताना पहिल्यांदाच प्रेमात पडली होती. तिचा शाळेत बॉयफ्रेंड होता. पण तिचे हे प्रेम फार काळ टिकले. नंतर तिचा ब्रेकअप झाला.

एका मुलाखतीत आपल्या शाळेतल्या प्रेमाविषयी बोलताना कियाराने सांगितले होते की, माझे पालक अनेकदा माझ्यावर अभ्यासासाठी दबाव टाकायचे. अभ्यास आणि पालकांच्या दबावामुळे मला इच्छा नसतानाही माझ्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करावा लागला होता. कालांतराने मी त्या ब्रेकअपमधून सावरले आणि माझे शिक्षण पूर्ण करून मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला.

त्याच मुलाखतीत कियाराला विचारण्यात आले होते की, जर तुझ्या बॉयफ्रेंडने तुला फसवले तर तू काय करशील ? यावर ती म्हणाली की, मी त्याला ब्लॉक करेन. जर त्याने माझी फसवणूक केली तर मी त्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन आणि पुन्हा कधीही त्याच्या जवळ जाणार नाही. यासोबत कियाराने आपल्या पहिल्या डेटच्या वेळी बनलेल्या नियमाबाबतही सांगितले.

कियाराने सांगितले की, जेव्हाही मी माझ्या पार्टनरसोबत पहिल्यांदा डेटवर जाईन तेव्हा मी त्याला किस करणे टाळेन. त्या क्षणाची त्याला थोडी वाट पाहावी लागेल.

कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जाते. कियाराच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने 2014 मध्ये ‘फगली’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले, परंतु तिला खरी लोकप्रियता ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून मिळाली. यानंतर तिने ‘जुग जुग जीयो’, ‘कबीर सिंग’ आणि ‘भूल भुलैया 2’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळं स्थान मिळवणारी कियारा अडवाणी एका चित्रपटासाठी 4 कोटी रुपये घेते.