खासगी जीवनावर अफवा पसरवणाऱ्यांवर बरसली कियारा.....

खासगी जीवनावर अफवा पसरवणाऱ्यांवर बरसली कियारा.. यांचा माहिती पुरवणारा आहे तरी कोण ? (Kiara Advani Asks ‘Who Are These Mirch Masala Sources’ Commenting On Her Personal Life)

भूलभुलैया-2 च्या भरघोस यशानंतर अभिनेत्री कियारा अडवाणी खूप चर्चेत होती. वेगवेगळ्या मीडिया हाऊसना मुलाखती देताना तिला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यात तिला बरेचदा सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारले जातात. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कियाराने तिचे मौन सोडले आणि तिच्या लव्ह लाइफ संबंधित अफवांचा खुलासा केला. आमच्या खासगी जीवनावर कमेंट करणाऱ्यांचा सोर्स कोण ? असा प्रश्न तिने मुलाखतीत विचारला.

कियाराच्या भूल भुलैया-2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळवले तसेच तिचा‘जुग-जुग जिओ’हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाली. त्याला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कियाराची प्रोफेशनल लाइफ खूप छान चालत असली तरी तिच्या खासगी जीवनात चालणाऱ्या गोष्टी बातम्यांच्या हे़डलाइऩ बनत आहेत.

नुकताच तिचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ब्रेकअप होऊन त्यांचे पुन्हा जुळल्याच्या चर्चा होत्या. सिद्धार्थसुद्धा तिच्या मुंबईतील घराबाहेर दिसला. एका मुलाखतीत कियाराने तिच्या खासगी जीवनाबद्दल खुलासा केला. ती म्हणाली जेव्हा माझ्याखासगी जीवनाबद्दल अफवा पसरवल्या जातात तेव्हा मी सुरक्षित नसते. माझ्या प्रोफेशनल आयुष्याला पाठिंबा देण्यासाठी खूप धन्यवाद. पण मला कधीच असे वाटले नव्हते की माझ्याबद्दल अशा कधी अफवा पसरवल्या जातील ज्यामुळे मी आणि माझे कुटुंब प्रभावित होऊ.

कियाराने पुढे सांगितले की, एखादी गोष्ट चुकीची असेल तर माझे कुटुंबसुद्धा त्याकडे फारसे लक्ष देत नाही. पण आपण ज्या ठिकाणी आपल्या कामामुळे असतो. तेव्हा तुमचे कामच दिसून येते. त्यामुळे आपल्या आयुष्याची दुसरी बाजू जगासमोर यावी असे कोणालाच वाटत नाही. पण आपल्या हातात काहीच नसते याचे मला खूप वाईट वाटते. आपल्या विषयी निर्माण होणाऱ्या अफवांवर जर जास्त रिअॅक्ट केले तर आपल्याच त्रास होईल कारण त्याचा काही अंत नाही.

आमच्या खासगी जीवनातल्या गोष्टींच्या मालमसाला लावून अफवा करणाऱ्यांचा सोर्स आहे तरी कोण हे मला जाणून घ्यायचे आहे. सिद्धार्थ आणि कियारा गेल्या 1 वर्षापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आले होते.