खुशी कपूरने आपली बहीण जान्हवी कपूर आणि फ्रेंड्स...

खुशी कपूरने आपली बहीण जान्हवी कपूर आणि फ्रेंड्ससोबत साजरा केला २१वा वाढदिवस (Khushi Kapoor Celebrated 21st Birthday With Janhvi Kapoor And Friends)

अलीकडेच जान्हवी कपूरने तिची बहीण खुशी कपूरचा २१ वा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला. बर्थडे पार्टीमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेल्या कपूर बहिणी खूपच क्यूट दिसत आहेत. जवळच्या काही मोजक्या मित्रांसोबत त्यांनी हा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

जान्हवीने आपल्या बहिणीच्या वाढदिवसासाठी टेरेसवर पार्टीची जय्यद तयारी केली होती अन्‌ पार्टीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदूही तीच ठरली होती. जान्हवीने गुलाबी बॉडीकॉनसह गुलाबी रंगाची हील्स घालून ‘बार्बी बेबी’ सारखा लूक केला होता तर खुशी कपूर देखील गुलाबी रंगाच्या कॉर्सेट-स्टाईल गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. जान्हवीने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी बर्थडे बॅशचे हे फोटो शेअर केले आहेत.

जान्हवीने सोशल मीडियावर खुशीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत, पहिल्या पोस्टमध्ये तिने स्वतःचा ‘बार्बी डॉल’ लूक शेअर केला आहे आणि जान्हवीने “बार्बी बेबी” अशी कॅप्शन लिहिली आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये जान्हवीने खुशीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात जान्हवीने “HBD my laddu baby” अशी कॅप्शन दिली आहे.

जान्हवीचा एक्स बॉयफ्रेंड अक्षत रंजनदेखील खुशीच्या बर्थ डे पार्टीत सामील होता. तिघांनी मिळून खूप मस्ती केल्याचे फोटोंवरून कळत आहे. खुशी आणि अक्षत काही फोटोंमध्ये एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. खुशीच्या वाढदिवसाच्या पार्टीला अंजिनी धवन, भूमी पेडणेकर, समिक्षा पेडणेकर, अगस्त्य नंदा आदींनी हजेरी लावली होती. तर शनाया कपूर, सोनम कपूर, अर्जुन कपूर आणि कुटुंबातील सदस्यांनी खुशीला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.