अक्षय कुमारने मौनी रॉय आणि तिच्या पतीची उडवली ख...
अक्षय कुमारने मौनी रॉय आणि तिच्या पतीची उडवली खिल्ली, अभिनेत्रीला म्हटले नागिन तर तिच्या पतीला म्हटले साप (Khiladi Akshay Kumar Mocked Mouni Roy, Calling Actress a Naagin and her Husband a Sapera)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘सेल्फी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी, अभिनेत्याच्या प्रसिद्धीत कोणतीही घट झालेली नाही. अलीकडेच अभिनेता कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गेला होता, तिथे त्याच्यासोबत मौनी रॉय, नोरा फतेही, दिशा पाटणी आणि सोनम बाजवा यांनी उपस्थिती लावली होती. यादरम्यान अक्षय कुमारने मौनी रॉयची खुलेआम खिल्ली उडवली आणि अभिनेत्रीला नाग आणि तिच्या पतीला साप म्हणून संबोधले.

कधी नागरिकत्वामुळे तर कधी ‘नॉर्थ अमेरिका टूर द एंटरटेनर्स’मुळे अक्षय कुमार सतत लाइमलाइटमध्ये असतो. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्याने मौनी रॉयची अशी खिल्ली उडवली की ती लाजेने अगदी चूर झाली.

शोमध्ये त्याने आपल्यासोबत आलेल्या नोरा फतेही, सोनम बाजवा, मौनी रॉय आणि दिशा पाटाणीची खिल्ली उडवली.

शोमध्ये अक्षय कुमार सर्वप्रथम मौनी रॉयचे नाव घेतो आणि तिला म्हणतो. हिचे नुकतेच लग्न झाले आहे पण हिने नागिनची भूमिका केल्यामुळे लोक हिच्या पतीला पुंगी वाजवायला देतात. ही एक नाग आहे आणि हिचा पती साप. अक्षयचे हे बोलने ऐकून मौनी लाजेने अगदीच चूर होऊन जाते.

यावर मौनीने अक्षयला तू खूप वाईट आहेस असे म्हटले. मौनी रॉयची खिल्ली उडवल्यानंतर, तो दिशाबद्दल म्हणतो की दिशाला प्रवासाची आवड आहे, त्यामुळे ती जर प्रवासाला गेली तर तिला तिथे वाघ सापडणार नाही याची तिला काळजी वाटते.

अक्षय कुमार एवढ्यावरच थांबत नाही, पुढे त्याने सोनम बाजवावरही निशाणा साधला आणि म्हटले की, सोनम बाजवा ही पहिली एअरहोस्टेस होती, आम्हाला तिच्याबद्दल काळजी वाटते की फ्लाइटमध्ये कोणी बेल वाजवली तर ती कदाचित उठून निघून जाईल. याशिवाय अर्चना पूरण सिंहसोबतही तो थट्टा करताना दिसला.

नुकतेच मौनी रॉयने अक्षय कुमारसोबत एक सेल्फी शेअर केला आहे. फोटोंमध्ये अक्षय आणि मौनी दोघेही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होते. दोघांच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला, याआधी ही जोडी ‘गोल्ड’ चित्रपटात दिसली होती. अक्षयचा ‘सेल्फी’ हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे, त्यात इमरान हाश्मी, नुसरत भरुचा, डायना पेंटी आणि मृणाल ठाकूर या कलाकारांनी काम केले आहे.