पती रसिक दवेच्या निधनावर केतकी दवे म्हणते, R...

पती रसिक दवेच्या निधनावर केतकी दवे म्हणते, ‘आयुष्य आता पूर्वीसारखे राहिले नाही. त्याची उणीव नेहमीच भासेल.’ (Ketki Dave talks about her husband actor Rasik Dave, Life will never be the same, His absent will always be felt)

हिंदी-गुजराती चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केलेला व अभिनेत्री केतकी दवे हिचा पती रसिक दवे याचे २९ जुलै रोजी निधन झाले. त्याला किडनीचा विकार जडला होता व तो डायलिसिसचे उपचार घेत होता. त्याच्या निधनाने केतकी दवे उन्मळून पडली आहे. अन्‌ तिने आपली व्यथा बोलून दाखवली आहे.

एका मुलाखतीत केतकी म्हणते, ”रसिकला किडनीचा विकार जडला होता व तो डायलिसिसचे उपचार घेत होता. पण आपल्या आजारपणाची तो वाच्यता करत नव्हता. सगळं काही ठीक होईल, अशी त्याला आशा होती. पण ते योग्य नाही, हे आम्ही जाणून होतो. मी एक नाटक करणार होते, पण मी ते करण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यावर रसिक म्हणाला होता की, तू सतत काम कर. शो मस्ट गो ऑन. काम थांबवू नकोस. तो आजारी होता, पण तू धीर खचू देऊ नकोस, असं त्याचं मला सांगणं होतं.”

केतकी पुढे म्हणते, ”आता आयुष्य पहिल्यासारखे राहिले नाही. माझ्यासोबत कुटुंब आहे. आई, मुले, सासू ही माणसे मला धीर देत आहेत. पण त्याची उणीव भासते आहे.”

रसिकच्या आजारपणाबद्दल कळल्यावर मी कष्टी झाले होते, असे सांगून केतकी म्हणते,”पण माझ्या आईने माझी हिंमत वाढवली. दुःखाला तुझ्यावर कुरघोडी करू देऊ नकोस. येणाऱ्या संकटाचा धीटपणे सामना कर. आताही मी अंगी बळ आणते आहे. पण एवढं सोपं नाहिये. “

एका नाटकाच्या तालमीत केतकी व रसिक यांची १९७९ साली भेट झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर त्यांनी बऱ्याच नाटकात व टी.व्ही. मालिकांत एकत्र काम केले. १९८३ साली त्यांनी लग्न केले. ४७ वर्षे त्यांनी सुखाचा संसार केला. रिद्धी व अभिषेक अशी २ मुले त्यांना आहेत. ‘नच बलिये’ या कार्यक्रमात २००६ साली ते एकत्र दिसले होते. दोघांची गुजराती नाटक निर्मिती संस्था आहे.