ऑक्टोबर हिट मध्येही राहा फिट… (Keep Yours...

ऑक्टोबर हिट मध्येही राहा फिट… (Keep Yourself Fit In October Heat)

ऑक्टोबर महिना हा ऋतू संक्रमणाचा काळ असतो. ऑक्टोबर महिना सुरू होताच कडक उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमुळे जिवाची काहिली होते. ‘ऑक्टोबर हीट’ असा उल्लेख केल्या जाणार्‍या या ऋतूबदलाच्या काळामध्ये आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास विषाणूजन्य आजारांपासून ते उष्णतेच्या दाहामुळे निर्माण होणारे विविध आजार टाळणे शक्य आहे.
ऑक्टोबर महिन्यात हवेमध्ये उष्णता आणि दमटपणाचे प्रमाण वाढते. हे वातावरण विषाणूच्या वाढीसाठी पोषक असते. पावसाळ्यानंतर अचानक बदलत्या तापमानाशी जुळवून घेण्यास शरीराला वेळ लागतो. या काळात रोगप्रतिकारकशक्तीही कमी झालेली असते. त्यामुळे या काळात विषाणूजन्य तापासह संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. विषाणूजन्य ताप सर्वसाधारणपणे दोन ते चार दिवस राहतो. परंतु याच काळात डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने दोन दिवसांहून अधिक काळ ताप असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तडीने चाचण्या करून घ्याव्यात.

उष्माघात वाढतोय, काळजी घ्या…
ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उष्म्यामध्ये घाम येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरातील पाणी मोठय प्रमाणावर कमी होते. दिवसभरात कमीत कमी दीड लीटर ते जास्तीत अडीच लीटर पाणी शरीरात जाणे गरजेचे आहे.याशिवायही उन्हाळ्याचा त्रास जाणवू नये याकरिता काही उपाय आहेत. पाहूया –
उपाय
• – नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
•-  अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थिर राहील.

-•  उजव्याच कुशीवर जास्त वेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त  वेळ चालू  राहील. सकाळच्याआणि दुपारच्या जेवणानंतर मात्र थोडा वेळ डाव्या कुशीवर अवश्य झोपा, ज्यायोगे पाचक रस जास्त स्रवण्यास मदत होईल.
-•    उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.

-•    हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
-•    पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
-•    आवळा/कोकम/लिंबू/मठ्ठा/ताक इत्यादी सरबत जरूर प्या.

-•  माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा प्यायचे नाही.
– प्रत्येक काम सावकाश करा.
-•    दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खा.

-•  सकाळी ऊठल्यावर लगेच 1 ते 2 ग्लास कोमट पाणी सावकाश प्या.
-•    जेवतेवेळी मधे मधे एक दोन वेळा एखादा घोट असे थोडे पाणी प्यावे.
-•    ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी प्यावे.

-•    खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खा.
-•    जिरेपूड 1 चमचा + खडीसाखर 1 चमचा व 1 ग्लास  ताकातून रोज प्या. उष्णता वाढणार नाही.
– • रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळावे व बेंबीत घालावे. तसेच देशी गाईचे तुप नाकात घालावे.
– • उन्हापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी टोपी, छत्री, गॉगल वापरा.