थंडाई देणारा निळा रंग (Keep Home Cool With Blue...

थंडाई देणारा निळा रंग (Keep Home Cool With Blue Color)

सध्या कडक उन्हापासून बचाव म्हणून आपण आहार-विहारात बर्‍यापैकी बदल करतोय. आता आपल्या घरच्या डेकोरमध्येही थंड जाणीव देणार्‍या निळ्या रंगाला सामील करा आणि कुल व्हा.
निळा रंग हा नैसर्गिक स्वरूपात आढळणारा रंग आहे. वर नभाकडे पाहिलं की विश्‍वात व्यापून असलेला निळा रंग आपल्या नजरेस पडतो. या नभाचं प्रतिबिंब जिथे पडतं ते पाणीही निळं दिसतं.
सर्वत्र व्यापून राहिलेला हा निळा रंग डोळ्यांना शांत करतो. म्हणूनच हा रंग ‘थंड रंग’ या प्रकारात येतो.


हा अद्भुत रम्य, सुखदायक आणि शांत रंग आहे.
सौम्य निळा रंग बेडरूमसाठी, तसंच मुलांच्या खोलीसाठीही अतिशय आदर्श रंग आहे.
स्थिरता आणि विश्‍वासार्हतेचं चिन्ह म्हणून या रंगाकडे पाहिलं जातं.
या रंगामुळे मनावरचा ताण हलका होऊन आपणास शांत झोप लागते.
हा आधुनिकता आणि पारंपरिकता अशा दोघांचीही सांगड घालणारा रंग आहे.


दररोज दृष्टीस पडणार्‍या या निळ्या रंगाची जणू आपल्या डोळ्यांना सवय झालेली आहे. या रंगाच्या सहवासात एक आल्हाददायी वातावरणाची जाणीव आपल्याला होत राहते. त्यामुळेच या रंगाचं सुशोभीकरण घरामध्ये केलं तर बाहेर कितीही तप्त वातावरण असलं, तरी आपल्या घरात कुल राहता येणं शक्य आहे.