ब्लू बिकिनीत कविता कौशिकचे शीर्षासन पाहून चाहते...

ब्लू बिकिनीत कविता कौशिकचे शीर्षासन पाहून चाहते झाले फिदा (Kavita Kaushik Does Headstand On The Beach In Blue Bikini : Fans Loves Her Stunning Photo)

‘एफ. आय. आर.’ या मालिकेची नायिका कविता कौशिक चांगली कलाकार आहे. अभिनयाबरोबरच फिटनेसबाबत ती कायम चर्चेत राहते. योग आणि व्यायाम करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर टाकत असते. आता आपले नवे अफलातून फोटो टाकून तिने चाहत्यांना प्रभावित केले आहे. ब्लू बिकिनी घालून बीचवर शीर्षासन करत असल्याचे हे फोटो आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

समुद्रकिनाऱ्यावर स्वीम सूट घालून बागडत असल्याचे फोटो प्रसिद्ध करून कविता चाहत्यांचे मनोरंजन करत असते. पण आता ती ब्लू बिकिनी घालून शीर्षासन करताना नव्या फोटोत दिसत आहे.

कविताच्या या चक्रावून टाकणाऱ्या शीर्षासनाचे फोटो बघून, फिटनेसबाबत तिचे चाहते कौतुक करताहेत. याआधी पण तिचे अशा प्रकारचे फोटो पाहून चाहते फिदा झाले होते.

अलिकडेच कविताने आपल्या बिल्डींगमधील लोकांना गोलगप्पे (पाणी-पुरी) वाटत असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये ती लोकांना गोलगप्पे खायला देताना दिसली होती.

सोशल मीडियावर कविता कौशिकचे चांगलेच चाहते आहेत. कारण निसर्गरम्य वातावरणात विहार करत असलेल्या रुपात आणि योग व व्यायामाचे फोटो ती प्रसिद्ध करते. जे चाहत्यांना मोहित करतात. स्वतःला फिट राखण्यासाठी ती व्यायाम आणि आहार नियंत्रण करते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कविताच्या काम कौशल्याबाबत बोलायचं तर एफ. आय. आर. या टी.व्ही. मालिकेतील ती साकार करत असलेली चंद्रमुखी चौटाला चांगलीच लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये पण ती दिसली होती. ‘झलक दिखला जा’ आणि ‘नच बलिये’ या रिॲलिटी शो मध्ये पण ती दिसली होती.