‘करोडपती’ चा मराठी अवतार (Kaun Bane...
‘करोडपती’ चा मराठी अवतार (Kaun Banega Crorepati In Marathi)

By Atul Raut in मनोरंजन , मालिका दर्शन
महानायक अमिताभ बच्चन सादर करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा अतीव लोकप्रिय कार्यक्रम आता मराठीमध्ये पुन्हा येत आहे. सोनी मराठी वाहिनीवरून तो सुरू होत असून त्यासाठी स्पर्धकांची नोंदणी २४ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी सोनी लिव्ह ऍपवर जाऊन नोंदणी करावी.
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहे. हा कार्यक्रम मराठी चॅनलवर पहिल्यांदा सुरू झाला होता, तेव्हा सचिननेच त्याचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये हा कार्यक्रम करण्यात आला. त्याचे सूत्रसंचालन ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी केलं होतं. आता पुन्हा सूत्रधाराच्या भूमिकेत सचिन खेडेकर दिसेल.

‘मला खड्यासारखं बाजूला काढलं… १६ कोटींचं नुकसान झालं…’ हसरा गोविंदा सांगतोय् आपली रडकथा!’