कतरिना कैफच्या अंगठीचा होतोय फारच गवगवा, तिचं व...

कतरिना कैफच्या अंगठीचा होतोय फारच गवगवा, तिचं वैशिष्टय काय? किंमत किती? जाणून घेऊया (Katrina Kaif’s Engagement Ring Is Going Viral : Know What’s Its Speciality And Price)

कतरिना कैफ आणि विकी कौशल काल लग्नाच्या बेडीत अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. त्यातून कतरिनाचे दागिने, ड्रेस याबद्दल लोक बरीच चर्चा करत आहेत. विशेष करून तिचं मंगळसूत्र आणि अंगठी यांचा फारच गवगवा होतो आहे.

Specialty, Price, Kaif’s Engagement Ring

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या फोटोंमधून कतरिनाने घातलेली हिरेजडित निळ्या सफायरची अंगठी ठळकपणे दिसत होती. हा सफायर अर्थात नीलम वैशिष्टयपूर्ण आहे. लक्षात घ्या, प्रिन्स चार्लसने राजकुमारी डायनाला अशीच नीलमची अंगठी घातली होती. इथे कळलेल्या माहितीनुसार कतरिनाने लग्नात घातलेल्या या अंगठीची किंमत ७ लाख ४० हजार रुपये आहे.

Specialty, Price, Kaif’s Engagement Ring

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
कतरिना कैफचे मंगळसूत्र, विकी कौशलने सब्यसाची कडून तयार करून घेतले आहे.  ते गोल्डन चेनचे असून त्यात दोन छोटे ड्रॉप-डाऊन हिरे जडवले आहेत.

Specialty, Price, Kaif’s Engagement Ring

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सवाई माधोपूर येथील सिक्स सेंस फोर्ट बरवारा हॉटेलात, कतरिना-विकीचा लग्नसमारंभ झाला. त्यामध्ये त्यांचे कुटुंबिय आणि निकटवर्तीय सामील झाले होते.

Specialty, Price, Kaif’s Engagement Ring

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम