नवरी नटली… पाहा कतरिना कैफचा आकर्षक ब्राय...

नवरी नटली… पाहा कतरिना कैफचा आकर्षक ब्रायडल लूक… (Katrina Kaif’s bridal looks that prove she’ll make the most gorgeous bride)

सध्या बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त जर काय चर्चिलं जात असेल तर ते आहे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचं लग्न. त्यांचं लग्न जसं जवळ येतंय तसं उभयतांच्या लग्नाशी संबंधित लहानातली लहान गोष्टही जाणून घेण्यासाठीची चाहत्यांची उत्सुकता वाढताहे. त्यामुळे विकी आणि कतरिना यांना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती दर्शविली जात आहे. ९ डिसेंबर या दिवशी दोघं लग्नगाठ बांधतील परंतु त्यांच्या लग्नाचे विधी उद्यापासून म्हणजे ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे दोघांचे कुटुंबिय राजस्थानला जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ

दरम्यान कतरिनाचे चाहते आपल्या बार्बी डॉलला विकी कौशलची दुल्हनिया बनताना पाहू इच्छित आहेत. परंतु, उभयतांना फारसा गाजावाजा न करता लग्न करायचे असल्याने चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. कतरिनाच्या खऱ्या ब्रायडल लूकचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवूच; पण सध्या तिच्या रील लाइफमधील ब्रायडल लुकचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. या फोटोंतही कतरिना कमालीची सुंदर दिसते आहे.

Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ

 कतरिनाने फॅशन डिझायनर्ससाठी अनेकदा ब्रायडल शूट केले आहे. तिच्या याच शूटचे हे काही फोटोज…

मागे एकदा कतरिनाने एका मॅगझीनच्या कव्हरसाठी ब्रायडल शूट केले होते, तिचा त्यावरील फोटो पाहून चाहते वेडे झाले होते.

Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ
Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ

कतरिनाने अनेक ज्वेलरी ब्रांड्‌सच्या ब्रायडल कलेक्शनसाठी जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातींमधील तिच्या ब्रायडल लूकचीही खूप प्रशंसा झाली.

Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ
Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ
Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ

अक्षय कुमारसोबतच्या ‘सिंह इज किंग’ या चित्रपटात कतरिना नवरी बनलेली दिसली होती.

Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ
Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ
Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ

याशिवाय ‘मेरे ब्रदर की दुल्हन’मध्ये कतरिना मस्त, निश्चिंत, मस्तीखोर मुलीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाच्या एका सीक्वेन्समध्ये ती एका नववधूच्या लूकमध्ये दिसली होती.

Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ
Katrina Kaif’s bridal looks, gorgeous bride, कतरिना कैफ, कतरिना कैफ

लग्नाच्या या बातम्यां दरम्यान कतरिना कैफ काल रात्री विकी कौशलच्या घरी पोहोचली. पांढऱ्या रंगाची साडी आणि हलका मेक-अप केलेल्या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर नववधूचे तेज स्पष्ट दिसत होते. यावेळी, तिने पापाराझींना देखील निराश केले नाही आणि त्यांना फोटो क्लिक करण्याची संधी दिली.