कतरीना कैफने पाठविले मालदीव बेटांवरून हॉट बिकीन...

कतरीना कैफने पाठविले मालदीव बेटांवरून हॉट बिकीनी फोटो : चाहते विचारतात – हनीमूनला तू एकटीच कशी? नवरा कौशल कुठे आहे? (Katrina Kaif Shares New Bikini Pictures From Maldives, Fans Asking, Where Is Kaushal Baba?)

कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नानंतर हनीमूनसाठी मालदीवला जाऊन लगेचच आपापल्या कामावर रुजू झाले. आता कॅट पुन्हा मालदीवमध्ये आहे. आणि तेथील बेटांवरून तिने स्वतःचे हॉट बिकीनी फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये कॅट एकटीच दिसत असल्यामुळे चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, नवरा कौशल कुठे आहे? विकी तिच्यासोबत आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत.

या फोटोंमध्ये कॅटने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे, ज्यामध्ये स्पोर्ट्स ब्रा आणि हाय वेस्ट बॉटम आहे. त्यावर, कॅटने व्हाइट शीयर श्रग घातला आहे. खरोखर यात ती खूपच हॉट दिसते आहे.

वास्तविक, कॅट एका ब्रँडच्या शूटसाठी मालदीवला गेली आहे. परंतु, चाहत्यांना वाटले की ती विकीसोबत हॉलिडे किंवा हनीमूनसाठी गेली आहे. कॅटचे ​​हॉट फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. कोणी तिला हॉटेस्ट तर कोणी राणी म्हणत आहेत. लग्नानंतर कॅट अधिक सुंदर झाल्याचेही चाहते म्हणत आहेत.

त्याचवेळी काही चाहते नवरा कौशल कुठे आहे? असं विचारत आहेत. हनीमूनसाठी एकटीच आली आहेस का? असंही कोणी तिला विचारत आहे. मात्र कॅट हनीमूनसाठी नाही, तर शूटिंगसाठी तेथे गेली आहे.

याआधीही कॅटने असाच एक हॉट फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने अॅनिमल प्रिंटचा शीयर टॉप घातला आहे.

कॅटच्या पुढच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ती सलमान खान सोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे आणि ‘जी लें जरा’ मध्ये देखील दिसणार आहे.