स्टाइलिश आणि बोल्ड लूक असलेल्या व्हिडिओत कतरीना...

स्टाइलिश आणि बोल्ड लूक असलेल्या व्हिडिओत कतरीना कैफचा उन्मुक्त वावर (Katrina Kaif Shares Her Stylish And Bold Look Video, Must Watch!)

बॉलिवूडची ब्युटी क्वीन अशी ओळख असलेल्या अभिनेत्री कतरीना कैफचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कतरीनाच्या या बोल्ड आणि हॉट व्हिडिओने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाइट कपड्यात मोकळे केस सोडून कतरीना खूपच सेक्सी दिसत आहे.

कतरीनाची फॅशन आणि स्टाइल नेहमीच चाहत्यांना भुरळ घालते. कतरीना सतत तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा कतरीनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो व्हिडिओ पाहून तिचे चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडले आहेत.

व्हायरल व्हिडिओत कतरीनाने  ब्लॅक अॅण्ड व्हाइट रेषा असलेले कपडे घातलेले दिसतात. अभिनेत्रीने खुर्चीवर बसत केस मोकळे सोडून फोटोसाठी पोज दिल्या आहेत. तिचे मनमोहक हास्य चाहत्यांचे मनं जिंकत आहे. हा लेटेस्ट व्हिडिओ कतरीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओच्या पार्श्वभूमीला लेट नाइट टॉकिंग हे गाणे सुरु आहे. कतरीनाच्या या बोल्ड व्हि़डिओवर कमेंटमध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओ पूर्वी कतरीनाने तिच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. तिचे व विकी कौशलचे एकत्र फोटो पाहायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. कतरीनाचा लवकरच भूत पोलिस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.