कतरीना कैफच्या घरात ही आहे मौल्यवान गोष्ट, अभिन...

कतरीना कैफच्या घरात ही आहे मौल्यवान गोष्ट, अभिनेत्रीने केला खुलासा (Katrina Kaif Reveals Her Most ‘Precious Thing’ At Home)

अभिनेत्री कतरीना कैफने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत लाइव्ह सेशन घेतले होते. या लाईव्हदरम्यान कतरीनाने आपल्या घरातील सर्वात मौल्यवान गोष्टीबद्दल खुलासा केला.
कतरीना कैफ आणि विकी कौशलबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता असते. मात्र हे दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे उघडपणे बोलत नाहीत. पण कधी त्यांनी एकमेकांबद्दल काही म्हटलेच तर ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते.


अभिनेत्री कतरीना कैफने अलीकडेच आपला चित्रपट ‘फोन भूत’च्या प्रमोशनसाठी इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतले होते. यामध्ये, अभिनेत्रीने आपल्या घरातील सर्वात मौल्यवान गोष्ट सांगितली.
या लाइव्ह सेशनदरम्यान एका चाहत्याने अभिनेत्रीला तुमच्या घरातील सर्वात सुंदर गोष्ट कोणती असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी कतरीना काही क्षण थांबली. मग म्हणाली- “माझ्या घरातील सर्वात मौल्यवान व्यक्ती म्हणजे माझा नवरा. ‘विकेट’चे हे उत्तर ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले.


अभिनेत्रीचे उत्तर ऐकल्यानंतर तिच्या चाहत्यांनी हार्ट इमोजींनी कमेंट करायला सुरूवात केली. नंतर याच प्रश्नाचे उत्तर देताना कतरीना म्हणाली, ‘त्याच्यानंतर माझ्याकडे असलेली सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे माझी पुस्तके असतील.’
याआधीही हे जोडपे अनेकदा चर्चेत होते. मध्यंतरी रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीत जेव्हा विकीने पत्नी कतरीनाला कारमध्ये आरामात बसण्यास मदत केली तसेच कारचा दरवाजा बंद करण्यापूर्वी विकीने तिची साडी उचलली आणि ती व्यवस्थित बसली आहे की नाही ते पाहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पती म्हणून कामगिरी पार पाडताना त्याने आपल्या चाहत्यांची मने जिंकली होती.