कतरीना कॅफ या खेळात आहे पारंगत (Katrina Kaif is...

कतरीना कॅफ या खेळात आहे पारंगत (Katrina Kaif is the Master of This Game, You Will Also be Surprised to Know Hobbies of Actress)

बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कतरीना कैफने नुकताच पती विकी कौशलसोबत लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला. कतरीना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात पत्नी आणि सून या जबाबदाऱ्याही पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनय आणि सौंदर्यासोबत ती एका खेळात सुद्धा पारंगत आहे.

कतरीनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. कतरीनाला 6 बहिणी आहेत. तिने वयाच्या 16 व्या वर्षीच मॉडेलिंग करायला सुरुवात केली. कतरीना कैफचे नाव सलमान खान, रणबीर कपूर यांसारख्या अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले, पण तिचे लग्न अभिनेता विक्की कौशलसोबत झाले. कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली.

कतरीना कैफच्या छंदांबद्दल सांगायचे तर, अभिनयाव्यतिरिक्त तिला नृत्याची खूप आवड आहे. याशिवाय तिला गिटार वाजवायलाही आवडते. तिला जेव्हा फावला वेळ मिळतो तेव्हा ती आपला हा छंद पूर्ण करते. इतकेच नाही तर कॅटला पेंटिंगचीही खूप आवड आहे ती  बुद्धिबळही खूप उत्तम खेळते. कतरीना बुद्धिबळात पारंगत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

कतरीनाला तिचे चाहते प्रेमाने कॅट या नावाने हाक मारतात, पण तिला मात्र हे नाव आवडत नाही. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे. याशिवाय तिला पूजा-पाठ करायला खूप आवडतात. ती खूप धार्मिक आहे. कतरीना सध्या आपला आगामी चित्रपट फोनभूतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम