करोडोंची संपत्ती असून देखील कतरीना कैफ भाड्याच्...

करोडोंची संपत्ती असून देखील कतरीना कैफ भाड्याच्या घरात का राहते? (Katrina Kaif Having Property Worth Crores, Still She Lives In a Rented Flat)

बॉलिवूडचे कलाकार आजकाल चित्रपटात काम करण्यासाठी करोडो रुपयांचा मेहनताना घेतात. कतरीना कैफ ही पण त्यापैकी एक आहे. तेव्हा कतरीनाने आजवर करोडो रुपये कमावले आहेत. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की, करोडो रुपयांची संपत्ती असून देखील कतरीना अद्याप भाड्याच्या घरात राहते. आपण स्वतःचं घर विकत का घेतलं नाही, याचा खुलासा तिने करण जोहर शो मध्ये केला आहे.

मिडिया रिपोर्टनुसार कतरीना, अंदाजे ३० मिलियन डॉलर, म्हणजेच २२२ करोड रुपयांची मालकीण आहे. पण ती स्वतःचं घर का विकत घेऊ शकली नाही, हे एक गौडबंगाल आहे. २००३ साली ती या ग्लॅमर क्षेत्रात आली, तेव्हा मुंबईतील बांद्रे उपनगरात गुलदेव सागर या इमारतीत, ती भाड्याच्या घरात राहत होती. रणबीर कपूरशी तिचे प्रेमप्रकरण रंगले तेव्हा ती २०१४ साली त्याच्या कार्टर रोड वरील सिल्वर सॅन्ड अपार्टमेन्टमध्ये राहायला आली. पण २०१६ साली त्यांचं ब्रेकअप झालं.

या ब्रेकअप नंतर ती मेरी चर्च जवळील एका घरात शिफ्ट झाली होती. तिथूनही ती निघाली आणि आत्ता अंधेरी पश्चिमेतील मौर्या हाऊसमध्ये आपल्या बहिणीसोबत राहते. गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा कतरीनाने या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामध्ये ती घरातील केर काढताना दिसते आहे.

करोडोंची संपत्ती असूनही भाड्याच्या घरात का राहतेस? या प्रश्नाचा खुलासा, करण जोहर शो मध्ये तिने केला. करण आणि वरुण धवनने तिला विचारलं होतं की, ख्रिसमस पार्टीसाठी तू आम्हाला घरी का नाही बोलवलंस? तेव्हा ती म्हणाली होती की, माझं घर फार लहान आहे. म्हणून…

मग मोठं घर का घेत नाहीस? असं करण जोहरने विचारलं. अन्‌ स्वतःच सांगितले की कतरीना चांगल्या प्रॉपर्टीच्या शोधात आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कतरीनाने या प्रश्नावर उत्तर दिलं. ते असं की, दोस्त, रिलेशनशिप आणि घर या गोष्टी माणूस आपल्या स्वभावानुसार निवडतो. तेव्हा मला सही घर मिळेल, तेव्हा मी ते अवश्य खरेदी करीन.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कतरीना बरीच वर्षे या इंडस्ट्रीत आहे. सिनेमाबरोबरच मॉडेलिंग आणि जाहिरात क्षेत्रात काम करून ती खूप पैसे कमावते. सिनेमासाठी तर ती ९ ते १० कोटी रुपये आकारते, असं म्हणतात. तरी ती भाडोत्री म्हणून राहते. असं असलं तरी तिला चांगल्या मोटारगाड्यांचा शौक आहे. तिच्यापाशी बऱ्याच आलिशान गाड्या आहेत.