विकी कौशलच्या या सवयीला कंटाळते कतरीना कैफ (Kat...

विकी कौशलच्या या सवयीला कंटाळते कतरीना कैफ (Katrina Kaif Gets Upset With This Habit of Vicky Kaushal, Actress Made Interesting Disclosure About Her Husband)

कतरीना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधल्या रोमॅण्टिक कपल्सपैकी एक आहेत. या जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. कतरीना आणि विकी कौशल लग्नानंतरच्या सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकलेले कतरीना आणि विकी अनेकदा त्यांच्या रोमँटिक फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. कतरीनाने नुकताच आपल्या पतीच्या एका सवयीला खूप वैतागल्याचा खुलासा केला.

अलीकडेच, कतरीनाच्या कॉस्मेटिक ब्रँडला तीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने कतरीनाने एका मुलाखतीत पती विकी कौशलशी संबंधित एक मनोरंजक खुलासा केला आहे. कॅटने सांगितले की, जेव्हा मला रात्री झोप येत नाही तेव्हा विकी माझ्यासाठी गाणे गातो. तो गाणे गाऊन मला झोपवण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला विकी कौशलच्या चांगल्या सवयीबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, विकीला गाणं गायला आणि नाचायला खूप आवडते. त्यातून त्याला मिळणारा आनंद पाहण्यासारखा असतो. मला विकीची ही सवय खूप आवडते.

जेव्हा कतरीनाला विकी कौशलच्या वाईट सवयीबद्दल विचारले तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली. तिने हसून उत्तर दिले की, विकी कधीकधी लहान मुलांप्रमाणे खूप हट्टी होतो. त्याचा हट्टीपणा मला कधीकधी खूप त्रास देतो. कॅटने सांगितले की, विकीची हीच सवय मला त्रास देते.

 कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी गेल्या वर्षी 9 डिसेंबरसा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे भव्य लग्न केले होते. त्यांनी आपल्या लग्नसोहळ्याशी संबंधित सर्व गोष्टी गुप्त ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.

दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास कतरीना आणि विकी दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. कतरीना सलमानसोबतच्या टायगर 3 मध्ये व्यस्त आहे तर विकी सुद्धा आपल्या कामांमध्ये व्यस्त आहे.