कतरीना कैफने सासरी साजरी केली होळी (Katrina Kai...

कतरीना कैफने सासरी साजरी केली होळी (Katrina Kaif Celebrates Holi With Husband And In Laws)

कतरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर आलेला पहिलाच सण होळीचा. त्यांनी हा सण घरीच कसा साजरा केला, त्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे.

लग्नानंतर कतरीनाने सासरी साजरी केली आपली पहिलीच होळी. इन्स्टाग्राम वर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती सासरकडच्या लोकांसोबत रंगांची उधळण करताना दिसते आहे. विकीने पण घरच्या लोकांसोबत रंग खेळतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत.

दोन्ही फोटो विकीच्या घरातील बाल्कनीमध्ये घेण्यात आले असून कतरीना विकीच्या मागे, आपली सासू वीणा कौशल सोबत दिसते आहे. शिवाय तिचे दीर सनी कौशल व सासरे श्याम कौशल हे देखील दिसत आहेत. विकीची आई आपल्या सूनबाईला रंग लावते आहे. सगळ्यांचे चेहरे रंगले आहेत. सर्व कुटुंब आनंदी दिसत आहे.

छायाचित्रे प्रसिद्ध करून कतरीनाने इन्स्टाग्रामवर सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विकीने पण फोटो प्रसिद्ध तरून शुभेच्छा दिल्या आहेत.

कतरीना आणि विकी यांच्या या होळी साजरी करण्याच्या फोटोंवर चाहत्यांनी पसंती व्यक्त केली आहे.