कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची लग्नाआधीची प्रेम...
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची लग्नाआधीची प्रेमप्रकरणं… (Katrina Kaif And Vicky Kaushal’s Past Love Affairs & Dating History That Created A Lot Of Buzz)

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील एका किल्ल्यावर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची घटिका समिप आली आहे, लवकरच त्यांच्यातील प्रेम लग्नापर्यंत पोहोचेल, यात शंकाच नाही. परंतु विकी आणि कतरिना एकमेकांच्या प्रेमात पडण्याआधीचीही त्यांची प्रेमप्रकरणे चर्चिली गेली आहेत. पाहुया उभयतांची लग्नाआधीची प्रेमप्रकरणं…
विकी कौशलच्या बाबतीत बोलायचे तर कतरिना ही पहिली मुलगी नाही, जिच्या तो प्रमात पडला आहे, कॅटच्या आधी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री हरलीन सेठीसोबत विकीचे प्रेम जुळले होते. दोघंही त्यांच्या नात्याबाबत गंभीर होते. दोघं एकत्र सुट्टी घालवायचे. त्यांच्या वागण्यावरून वाटत होते की दोघं लवकरच लग्नही करतील. त्यावेळेस विकी त्याच्या करिअरमध्ये फारसा यशस्वी नव्हता परंतु उरी चित्रपटाच्या यशानंतर विकीला स्वतंत्र ओळख मिळाली. त्यावेळीही हरलीन विकीसोबत त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसली. परंतु मग माशी शिंकली आणि दोघं अलग झाले. असं म्हणतात की यशाच्या पायऱ्या चढत विकी पुढे निघून गेला अन् त्याने हरलीनची साथ सोडली.

हरलीनने इन्स्टाग्राम वर विकी सोबतचा फोटो प्रदर्शित करत उरीचं बरंच प्रमोशन केलं होतं, २०१९ सालामध्ये या जोडप्यामध्ये अतिशय मजबूत असं प्रेमाचं नातं होतं. नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.

हरलीनने इन्स्टावर एक कविता पोस्ट करत आपल्या ब्रेकअपची बातमी दिली होती. कारण लोक तिला नेहमी विकीची एक्स असे म्हणत हिणवायचे. तेव्हा तिने कवितेतून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात तिनं म्हटलं होतं की, ही त्याची मर्जी होती.
कॅटबद्दल काय बोलायचं? तिच्या प्रेमप्रकरणांची लिस्ट मोठीच होईल. बॉलिवूडमध्ये तिला चांगला ब्रेक मिळाला, ज्याचे श्रेय सलमान खानला जातं. सलमानसोबतचं तिचं प्रेमप्रकरण सर्वात जास्त काळ टिकलं. सात वर्षं ते एकमेकांना डेट करत होते. त्यांनी कितीही नाकारलं तरी त्यांचं नातं चाहत्यांपासून लपून राहिलं नाही. पण नंतर ते अलग झाले.

सलमाननंतर सिद्धार्थ माल्यासोबत तिचं सूत जुळलं, पण दोघांचे विचार जुळले नाहीत आणि त्यांचा ब्रेकअप झाला.
सलमाननंतर रणबीर कपूरसोबतचं प्रेमप्रकरण बऱ्यापैकी लांबलं. अजब प्रेम की ग़ज़ब कहानी मध्ये या दोघांची जोडी अतिशय क्युट वाटली. आणि रील लाइफ जोडपं, रिअल लाइफमध्ये एकत्र आलं. दोघंही ४-५ वर्षं रिलेशनशिपमध्ये होती. तेव्हा सगळ्यांना त्यांच्या लग्नाबद्दल खात्रीच वाटली होती. दोघांचे बीचवरील फोटोही व्हायरल झाले होते. फोटोंत कतरिना रणबीरसोबत बिकिनीत बिनधास्त मस्ती करताना दिसली. दोघं प्रेमात इतके पुढे गेले पण नात्यात बांधले गेले नाही. नाते तुटले आणि चाहत्यांचे मन दुखावले.

रणबीरनंतर काही काळ झाला असेल कतरिनाचं सिद्धार्थ मल्होत्रासोबत नाव जोडलं गेलं. बार बार देखो या सिनेमात एकत्र काम केल्यानंतर दोघांचं प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. परंतु ही अफवा असल्याचे कतरीनाने सांगितलं होतं.
कॅटच्या बॉयफ्रेंडच्या यादीत अक्षय कुमारचं नावही जोडलं गेलं होतं कारण दोघांची जोडी पडद्यावर लोकांना आवडू लागली होती. परंतु त्यांच्यात प्रेमासारखं कोणतंही नातं नसल्याचं दोघांनीही सांगितलं.

यादी काही संपत नाही, अजून एक नाव होतं, ज्याच्यासोबत कतरीनाचं नाव जोडलं गेलं. आणि ते नाव म्हणजे आदित्य रॉय कपूर. दोघं दीर्घकाळ खूप चांगले मित्र होते आणि दोघांमध्ये काहीतरी खास होतं, असं म्हटलं गेलं होतं. आणि आता तिच्या आयुष्यात विकी कौशलचं आगमन झालं आहे. दोघं लग्न करताहेत ही फारच चांगली गोष्ट आहे. त्यांच्या मागील प्रेमप्रकरणांची सावली त्यांच्या नवीन आयुष्यावर पडू नये व त्यांचे वैवाहिक जीवन सुखाचे जावो ही सदीच्छा !
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम /यु ट्युब/सोशल मीडिया