कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याच्या...

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याच्या धमक्या(Katrina Kaif And Icky Kaushal Get Death Threat : Complaint Fired In Police Station )

अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल नुकतेच मालदीववरुन परतले आहेत. कतरिनाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ते दोघे त्यांच्या मित्रपरिवारासह तिथे गेले होते. पण तिथून परतल्यावर कतरिना आणि विकीला सोशल मीडियावरुन जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. एका अज्ञात व्यक्तीकडून या धमक्या येत असल्याचे म्हटले जाते. कतरिना आणि विकीला धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिसांनी तक्रार नोंदवली असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

विकी कौशलने या संदर्भात सांताक्रूझ पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार एक अज्ञात व्यक्ती सोशल मीडियाद्वारे कतरिनावर नजर ठेवून होती. विकी कौशलने त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न ही केला. मात्र त्याने काही ऐकले नाही. शेवटी विकीने त्याची पोलिसांत तक्रार केली आहे.

विकी कौशलने पोलिसांत आपल्या पत्नीला एक अज्ञात व्यक्ती सतत धमकीचे संदेश पाठवत असून तिचा पाठलाग करत असल्याची तक्रार केली.

सेलिब्रेटींना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही सलमान खान व त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करला धमकी देण्यात आली होती.