काळी बिकिनी घालून कश्मीरा शाहने केला कहर : फॅन्...

काळी बिकिनी घालून कश्मीरा शाहने केला कहर : फॅन्स बघताहेत वारंवार तिचे फोटो (Kashmira Shah Shares Hot Video In Black Bikini, Fans Watching It Again And Again)

पूर्वाश्रमीची बोल्ड अभिनेत्री अन्‌ आता प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची झालेली पत्नी कश्मीरा शाह, आपल्या बोल्ड आणि हॉट लूक्सने चर्चेत असते. आपले हॉट फोटो व व्हिडिओज्‌ सोशल मीडियावर टाकून खळबळ माजवत असते. त्यानुसार काळ्या रंगाची तंग बिकिनी घालून तिने आपले व्हिडिओ व फोटो वारंवार पाहत आहेत.

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram
बिग बॉस १४ मध्ये दिसलेली कश्मीरा शाह लोकांच्या डोळ्यासमोर आहे. उन्हाळा आला, म्हणून हाशहुश्श करत तिने काळी व पिवळी फंकी बिकिनी घातली आहे. रेट्रो गाण्यावर ॲक्टिंग करत तिने स्लो मोशन व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ इतका हॉट आहे की, बघणाऱ्यांची कानशिले गरम होत आहेत.

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram
हा व्हिडिओ शेअर करताना तिनं लिहिलं आहे -‘कुणाशीही तुलना न करताना, आपल्याला जसं पाहिजे, तसं जगा. सूर्य आणि चंद्राची तुलना आहे का. त्यांच्या वेळेवर दोघेही चमकतात व प्रकाश देतात.’
इन्स्टाग्रामवर कश्मीरा अनोखा पॅटर्न दर्शविते आहे. ती चाहत्यांना काही ना काही सल्ला देत असते. यापूर्वी तिने स्विमींग पूलवर बिकिनी घातलेला व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तिनं लिहिलं होतं – ”आज एक नवा दिवस आहे. काल काय झालं ते विसरा नि आज नवी सुरुवात करा. कारण हा आज लवकरच उद्या होईल.”

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram
‘बिग बॉस १४’ मध्ये प्रवेश करण्यापूर्वी कश्मीरा शाहने आपले वजन कमालीचे कमी केले होते. त्यामुळे ती चर्चेत राहिली होती. आपण कोविड-१९च्या लॉकडाऊन काळात १३ ते १४ किलो वजन घटविलं, असं तिनं एका मुलाखतीत जाहीर केलं होतं.
कश्मीरा शाह पूर्वी बऱ्याच हिंदी चित्रपटात अवतरली होती. यस बॉस, प्यार तो होना ही था, दुल्हन बनूं मै तेरी, वेक अप सीड अशा चित्रपटात तिने भूमिका केल्या होत्या. तिनं एका मराठी चित्रपटातही काम केलं होतं. ‘नच बलिये’ या नृत्याच्या कार्यक्रमात ती २००७ साली चमकली होती.

कंगनाचे भयंकर वादग्रस्त ट्वीट : म्हणते – टॉयलेट स्वच्छ केले नाही तर गांधीजी आपल्या पत्नीला घराबाहेर काढत