पती कृष्णा अभिषेकचे चुंबन घेताना कश्मीरा शहाचा ...

पती कृष्णा अभिषेकचे चुंबन घेताना कश्मीरा शहाचा व्हिडिओ व्हायरल, स्पष्टीकरण देताना म्हणाली, मी दारु नव्हते प्यायले..(Kashmera Shah Talks About Her Viral Kiss Video With Krushna Abhishek, Says ‘I Wasn’t Drunk But)

अभिनेत्री कश्मीरा शाहचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पती कृष्णा अभिषेकला मीडिया समोरच किस करत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स तिला वाईट पद्धतीने ट्रोल करत आहेत. यावर आता कश्मीराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री आणि सूत्रसंचालक कश्मीरा शाहने  पती कृष्णा अभिषेकला सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर किस केले होते, त्यानंतर कश्मिरा प्रसिद्धीच्या झोतात आली होती. सोशल मीडियावर नेटिझन्स तिला खूप ट्रोल करत होते. मात्र आता नेटकऱ्यांच्या या वागण्यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने स्पष्टीकरण दिले की ती दारू पीत नाही. तिला जेटलॅग झाला होता, त्यामुळे नीट उभी राहू शकत नव्हती. कश्मीराने सांगितले- होय, मला माहित आहे की मला अशा अवस्थेत पाहून लोकांना वाटले असेल की मी खूप दारू प्यायली आहे. त्यामुळे मला नीट चालता नाही येत. पण खरेतर मला जेटलॅग झाला होता. मी नुकतीच लॉस एंजेलिसहून घरी गेले होते, मग तयार होऊन पार्टीला गेले. मी क्वचितच उभे राहू शकले, माझ्याकडे वाइनचा ग्लास होता, परंतु मला नशा चढली नव्हती.

काश्मीराने पती कृष्णा अभिषेकला ओठांचे चुंबन घेण्यासाठी जबरदस्तीने का ओढले याचे कारण सांगताना ती म्हणाली- मी ‘पीडीए म्हणजेच पब्लिक डिस्प्ले ऑफ़ अफेक्शनसाठी भुकेली होती’ म्हणूनच माझ्या पतीला चुंबन घेण्यासाठी खेचत होती, मी त्याला खूप दिवसांपासून भेटले नव्हते. सुमारे 3 आठवड्यांपासून. मला त्याची खूप आठवण आली आणि मला पीडीएची भूक लागली. म्हणूनच मी पार्टीत कृष्णाचे सर्वांसमोर चुंबन घेतले. मी माझ्या मुलांना मिस करत होते. आम्ही लवकरच लॉस एंजेलिसला सुट्टीसाठी जाण्याचा विचार करत आहोत.”

काश्मीरा शाह काही दिवसांपूर्वी बिग बॉस 16 च्या सक्सेस पार्टीमध्ये दिसली होती. तेथे तिने मीडियासमोर बोल्ड पोज दिल्या आणि पती कृष्णाला जबरदस्तीने ओढले आणि ओठांवर किस केले.