बिकिनीत बागडणारी काश्मीरा शहा, महाकुंभ साडीत दि...

बिकिनीत बागडणारी काश्मीरा शहा, महाकुंभ साडीत दिसते आहे खूपच सुंदर : चाहते म्हणतात – बिकिनी असो वा साडी, तू तर दिसते फारच सेक्सी (Kashmera Shah Stuns In Rohit Verma’s Mahakumbh Saree, Fans Say- Saree Or Bikini You Always Look Sexy)

वयाची पन्नाशी गाठली असली तरी काश्मीरा शहाचा फिटनेस चांगला आहे. तिचे कसलेले शरीर चाहते म्हणतात – तू तर दिवसेंदिवस तरुण होत चालली आहेस.

बिकिनी घातलेले आपले हॉट फोटो काश्मीरा अधूनमधून इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. पण आता तिने सोज्वळ अवतार धारण केला आहे. तिनं प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये ऑरेंज रंगाची साडी घातलेली दिसते आहे. त्यावर शंकराच्या त्रिशुळाची डिझाईन आहे. ही साडी तिला शोभून दिसते आहे.

फॅशन डिझायनर रोहित वर्माने ही साडी तयार केली असून ती महाकुंभ कलेक्शनमधील आहे. काश्मीराने फोटोच्या कॅप्शनमध्ये रोहित वर्माला टॅग केले आहे. ही साडी तिने एका खास इव्हेन्टमध्ये घातली होती.

रोहित वर्माने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं आहे की, ही साडी हिंदू धर्माचे प्रतीक आहे. तिचा रंग आणि डिझाइन अतिशय खास आणि सात्विक आहे. कॅश या साडीत फारच सुंदर दिसते आहे. त्यावर तिने मोठे पोल्का डॉटस्‌ असलेला ब्लाऊज घातला आहे. तो साडीच्या बॉर्डरला मॅच करतो आहे. ही साडी इतकी छान आहे की, त्यावर काही ॲक्सेसरीज्‌ घालण्याची कॅशला गरजच भासलेली नाही.

काश्मीराला या साडीत बघून चाहते आनंदीत झाले आहेत. एकजण म्हणतोय्‌ – साडी असो वा बिकिनी, तू तर दिसते आहेस फारच सेक्सी. अन्य वापरकर्ते तिला ग्रेसफूल, हॉट, स्टनर, गॉर्जियस, सुंदर असं लिहीत आहेत. काही चाहते म्हणतात की, तू साडीत जास्त सुंदर दिसतेस.

आपल्या इन्स्टा स्टोरीवर हे साडीवाले छायाचित्र पोस्ट करून काश्मीराने स्वतःला आणि रोहित वर्माला टॅग केलं आहे. ही साडी विकत घ्यायची असेल तर आम्हाला मेसेज करा, असंही ती लिहिते.