सचिन तेंडुलकरची मुलगी सारा दिसते बॉलिवूड अभिनेत...

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा दिसते बॉलिवूड अभिनेत्रींसारखीच सुंदर आणि ग्लॅमरस् (Kartik Aryan Reacts On Sachin Tendulkar’s Daughter Sara’s Latest Viral Picture, See Sara Tendulkar’s Glamorous Avatar)

भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही नुसतीच वयात आली नसून, अतिशय ग्लॅमरस झाली आहे. सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. साराचे इन्स्टाग्रामवर १३ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Sara Tendulkar’s Glamorous Avatar
Sara Tendulkar’s Glamorous Avatar

सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तिचे फोटोही लगेचच व्हायरल होतात. साराने तिचा बाल्कनीत उभी असलेला फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने एक पांढरा टॉप घातला आहे आणि ती एक गोड स्मित करताना दिसत आहे. लोकांना तिचा हा फोटो भलताच आवडला असून बॉलिवूडचे सेलिब्रिटीही तिच्या फोटोस पसंती देण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. अगदी कार्तिक आर्यन आणि अरमान मलिकलाही हा फोटो आवडला आहे. साराने या फोटोला कॅप्शन दिली आहे – या शहरातील सर्व हास्य!

Sara Tendulkar’s Glamorous Avatar
Sara Tendulkar’s Glamorous Avatar
Sara Tendulkar’s Glamorous Avatar

सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने साराच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं चांगलच लक्ष असतं. सध्या फिटनेसचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. सारा देखील स्वत:ला विकसित करण्यासाठी खूप वेळ देते, फिटनेससाठीही ती आवर्जून वेळ काढते. म्हणूनच सौंदर्याच्या बाबतीत सारा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे दिसत आहे. साराचा फॅशन सेन्स एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Sara Tendulkar’s Glamorous Avatar
Sara Tendulkar’s Glamorous Avatar

कोलकाताचा दमदार फलंदाज आणि टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आणि सारा हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय की काय अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती.

 (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)