पश्मीना रोशनशी असलेल्या संबंधांबाबत कार्तिक आर्...

पश्मीना रोशनशी असलेल्या संबंधांबाबत कार्तिक आर्यनने केला उलगडा (Kartik Aryan breaks his Silence on his Affair Rumours, Actor Said This About His relationship With Pashmina Roshan)

चित्रपटातील भूमिकांबरोबरच ज्याच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चा सध्या झडत आहेत, तो बॉलिवूडचा हिरो आहे कार्तिक आर्यन. चित्रपटसृष्टीतील काही नट्यांसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. अन्‌ आता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मीना रोशनसोबत तो डेटिंग करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अलिकडेच एका मुलाखतीत कार्तिकने स्वतः पश्मीनाशी असलेल्या आपल्या संबंधांबाबत उलगडा केला आहे.

हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मीना रोशनशी कार्तिकचे नाव अलिकडेच जोडले गेले आहे. हिच्या आधी कार्तिक, सारा अली खानशी डेट करतो आहे, अशा बातम्या आल्या होत्या. पण त्यांचे ब्रेकअप झाले अन्‌ आता पश्मीनाबाबत सत्य काय आहे, ते त्याने स्वतःच सांगितले आहे.

‘आता मी वलयांकित व्यक्ती झालो आहे. त्यामुळे माझ्या खासगी जीवनातील गोष्टी आता लोकांसमोर येणे क्रमप्राप्त आहे,’ असे एका मुलाखतीत कार्तिक बोलला. तो पुढे असेही बोलला की, ‘मी कोणाशी मैत्री केली तरी, त्याचे रुपांतर प्रेमसंबंधात केले जाईल. यामुळे दोन माणसे नक्कीच दुखावतात’ पश्मीनाबाबत तो म्हणाला, ‘आता मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करतो आहे. अशा अफवांचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही.’

कार्तिक आर्यनकडे आताशा बरीच कामे आहेत. कियारा अडवाणी सोबत ‘सत्यप्रेम की कथा’ तसेच ‘फ्रेडी’ या चित्रपटात तो काम करतो आहे. तसेच ‘शहजादा’ आणि ‘आशिकी ३’ या चित्रपटातही तो दिसणार आहे.