पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार म...
पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने कार्तिक आर्यनचा भावना अनावर, सोशल मीडियावर शेअर केला आनंद (Kartik Aaryan Wins First ‘Best Actor’ Award For Bhool Bhulaiyaa 2, Thanks His Fans, ‘Mehnat Ka Phal Meetha Hota Hai’)

सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणजेच कार्तिक आर्यनला नुकताच ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. कार्तिकने आपल्या फिल्मी करीअरमध्ये पहिल्यांदाच ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’चा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
२६ फेब्रुवारीला मुंबईत झी सिने अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. त्या सोहळ्याला इंडस्ट्रीतील जवळपास सर्व सेलेब्स सहभागी झाले होते. या अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूड सुपरस्टार कार्तिक आर्यनला ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटातील शानदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्रामवर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्याचा आनंद शेअर केला आहे. अभिनेत्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका हातात पुरस्कार घेत आहे आणि दुसऱ्या हातात भूल भुलैयाची हुक-स्टेप करत आहे.
अभिनेत्याने कॅप्शन लिहिले – प्रमुख भूमिकेसाठी माझा पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार !! मेहनतीचे फळ गोड असते ❤️ #RoohBaba नेहमीच खास राहतील 🤙🏻 @zeecineawards आणि भूल भुलैया 2 च्या संपूर्ण टीमचे आभार. माझ्या सर्व प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद! मी तुमचे असेच मनोरंजन करत राहिन हे माझे वचन आहे!
कार्तिक आर्यन नुकताच शहजादा चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्या सोबत क्रिती सेनॉन होती. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.