कार्तिक आर्यनने इकोनॉमी क्लासमधून केला प्रवास, ...

कार्तिक आर्यनने इकोनॉमी क्लासमधून केला प्रवास, कोणी म्हणालं खरा हिरो तर कोणी म्हटलं पब्लिसिटी स्टंट (Kartik Aaryan Travels In Economy Class, Actor Gets Grand Welcome From Fans, Watch Video)

कार्तिक आर्यनचे नाव सध्याच्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. इंडस्ट्रीत कोणीच पाठीशी नसताना त्याने आपले स्थान पक्के केले. सध्याचे त्याचे चित्रपट हे इतर सुपरस्टारच्या चित्रपटांपेक्षा जास्त चालतात. असे असून देखील तो त्याच्या स्टारडमचा फायदा घेत नाही. अनेकदा तो चाहत्यांना आपण त्यांच्यातलाच एक आहे असे वाटावे यासाठी गर्दीच्या ठिकाणीसुद्धा जातो. कार्तिकचा हाच साधेपणा चाहत्यांना नेहमीच आवडतो.

सोमवारी संध्याकाळी कार्तिकने सर्वसामान्य माणसांप्रमाणे विमानाच्या इकोनॉमी क्लासमधून प्रवास केला. आपल्या आवडत्या कलाकाराला त्यांच्यामध्ये असे पाहून चाहत्यांनीही आनंदाने उड्या मारल्या. विमानात त्यांनी कार्तिकला घेरले. त्याच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यास सुरुवात केली.

त्याला पाहून चाहत्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यावेळी त्याने सर्वांचे आभारही मानले. कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कार्तिकने मुंबईहून जोधपूरला इंडिगो विमानाने प्रवास केला होता. आपल्या चाहत्यांसोबत प्रवास करुन त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवून कार्तिकने त्यांची मने जिंकली.

चाहतेही त्याची खूप स्तुती करत होते. सोशल मीडियावर कार्तिकचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काही जण त्याला खरा हिरो म्हणत आहेत, तर अनेक जण कार्तिक खरोखरच नम्र असल्याचं कमेंटमध्ये म्हणत आहेत. तो खूपच साधा आहे. त्याच्यात गर्व नाही. कार्तिकची स्तुती करणाऱ्या लोकांसोबत काहींनी त्याला ट्रोल केले आहे. ट्रोलर्सनी कार्तिकच्या अशा प्रवासाला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे.

बर्‍याच युजर्सनी लिहिले की, जर चित्रपट येत असेल तर प्रमोशन आणि प्रसिद्धीसाठी नम्र व्हावे लागते, हा चित्रपट हिट होण्याचा फॉर्म्युला आहे.तर एकाने लिहिले की, इंडिगो जोधपूरला जाते, तिथे इकोनॉंमीने प्रवास करण्यापलिकडे त्याच्याकडे कोणता पर्याय नव्हता. पण जर त्याच्याजागी रणवीर सिंह, रणबीर कपूर किंवा आलिया भट्ट असते तर त्यांनी असा प्रवास टाळून नक्कीच प्रायव्हेट जेटचा वापर केला असता.