कार्तिक आर्यन झाला शाहिद कपूरचा भाडोत्री, भाडे ...

कार्तिक आर्यन झाला शाहिद कपूरचा भाडोत्री, भाडे म्हणून देणार भरमसाठ रक्कम(Kartik Aaryan Rents Shahid Kapoor’s Sea-facing Juhu Apartment For Whopping Price)

अभिनेता कार्तिक आर्यनचे करीअर सध्या उंच भरारी घेत असल्याचे पाहायला मिळते.लवकरच त्याचा शेहजादा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यामुळे तो चर्चेत आहे. पण कार्तिक आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेता आता शाहिद कपूरच्या सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहणार आहे. तेही भाडेकरू म्हणून. कार्तिक आर्यनने जुहूमध्ये शाहिद कपूरचे सी फेसिंग डुप्लेक्स घर भाड्याने घेतल्याचे वृत्त मीडियातून समोर आले आहे. समुद्रासमोर असलेल्या या डुप्लेक्स घरात राहण्यासाठी कार्तिक शाहिदला भाडे म्हणून मोठी रक्कम देणार आहे.

कार्तिक आर्यन बऱ्याच दिवसांपासून मुंबईत स्वत:साठी चांगले घर शोधत आहे. अखेर अभिनेत्याला त्याच्या आवडीचे घर मिळाले आहे. असेच घर कार्तिकला हवं होतं. मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यन शाहिद कपूरचा नवा भाडेकरू बनणार आहे. कार्तिकने जुहूमध्ये शाहिदचा सी फेसिंग डुप्लेक्स भाड्याने घेतला आहे. समुद्रासमोर असलेल्या या डुप्लेक्स घरात राहण्यासाठी कार्तिक शाहिदला मोठं भाडंही देईल.

शाहिद कपूर गेल्यावर्षीपर्यंत पत्नी आणि दोन मुलांसोबत त्या घरात राहत होता, पण आता शाहिदने ते घर सोडले असून तो मुंबईच्या वरळी भागात शिफ्ट झाला आहे. शहिदने आता हे सी फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट कार्तिक आर्यनला भाड्याने दिले आहे. सीफेसिंग असलेल्या या डुप्लेक्स अपार्टमेंटमधून जुहू बीच स्पष्टपणे दिसतो.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनने या सी फेसिंग डुप्लेक्स घरासाठी सिक्युरिटी म्हणून ४५ लाख रुपये जमा केल्याचेही वृत्त आहे.या घराचे मासिक भाडे 7.50 लाख रुपये आहे. याशिवाय, दरवर्षी भाडेवाढ म्हणून भाड्याच्या रक्कमेत 7.5% वाढ होईल.

शाहिद कपूरने हे घर 2014 मध्ये खरेदी केल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तेव्हा त्याचे लग्नही झाले नव्हते. हे अपार्टमेंट प्रणेता बिल्डिंगमध्ये असून 3,681 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. त्याच्या कंपाऊंडमध्ये पार्किंगसाठी दोन जागा आहेत.