आयुष्मान खुरानाने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टी...

आयुष्मान खुरानाने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत सहभागी झाले बॉलिवूड कलाकार (Kartik Aaryan, Kriti Sanon, Taapsee Pannu And Others At Ayushmann Khurrana’s Diwali Party, See Photos)

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि पत्नी ताहिरा कश्यपने इंडस्ट्रीतील आपल्या खास मित्रांसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. दिवाळीच्या काही दिवस आधी आयोजित केलेल्या या पार्टीत कार्तिक आर्यन, क्रिती सेनॉन, अनन्या पांडे, चित्रपट निर्माता करण जोहर, वरुण धवन- नताशा दलाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

डॉक्टर जी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांनी, आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी काल रात्री आपल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनीही आयुष्मानच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. लग्नाच्या रिसेप्शननंतर हे नवविवाहित जोडपे पहिल्यांदाच दिसले.

या पार्टीत अनन्या पांडे, करण जोहर आणि मनीष मल्होत्रा ​​यांचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला.

क्रिती सेनन आणि रकुल प्रीत सिंग या दोघींनी उपस्थित पापाराझींना एकत्र पोज दिल्या.

सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या कार्तिक आर्यनने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान करुन पार्टीत हजेरी लावली.

वरुण धवन पत्नी नताशा दलालसोबत पार्टीत सहभागी झाला होता.

अंगद बेदी आणि नेहा धूपियानेही दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.

राजकुमार राव पत्नी पत्रलेखासह दिवाळी पार्टीत सहभागी झाला होता.

रितेश देशमुख – जेनेलिया डिसूझा आणि अर्पिता खान यांनी एकत्र पोज दिल्या.