वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे मुंबई पोलिसांनी कार्...
वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे मुंबई पोलिसांनी कार्तिक आर्यनकडून केली दंड वसूली,वर ट्विट करत म्हणाले शहजादा असलास तरी दंड वसुली होणारच (Kartik Aaryan Issued Challan Mumbai Traffic Police Tweets Do Not Think Shehzadaa Can Break Rule)

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आपल्या ‘शहजादा’ या चित्रपटामुळे सोशल मीडियावर गेले काही दिवस चर्चेत होता. पण यावेळी मात्र त्याची वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कार्तिक आर्यनने रस्त्याच्या चुकीच्या बाजूला कार पार्क केल्यामुळे मुंबई पोलिसांनी शहजादा फेम कार्तिक आर्यनच्या कारचे चालान कापले आहे.
Problem? Problem yeh thi ki the car was parked on the wrong side!
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) February 18, 2023
Don't do the 'Bhool' of thinking that 'Shehzadaas' can flout traffic rules. #RulesAajKalAndForever pic.twitter.com/zrokch9rHl
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने रस्त्याच्या कडेला चुकीच्या बाजूला कार पार्क केल्यामुळे मुंबई पोलिसांनी चालान कापले आहे. ही कार कार्तिक आर्यनच्या नावावर नोंदणीकृत आहे. कार्तिक आर्यनच्या नावाने चालान कापण्यासोबतच मुंबई पोलिसांनी जनतेला सल्लाही दिला आहे. तेही चित्रपटाच्याच शैलीत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या लॅम्बोर्गिनी कारचे चलान कापले आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर अभिनेत्याच्या लॅम्बोर्गिनी कारचा. फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले की – ‘समस्या ही होती की वाहन चुकीच्या दिशेने पार्क केले होते. तुम्ही ही चूक कधीही करू नका आणि शेहजादा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू शकेल असा विचार कधीही करू नका.
पोलिसांनी अभिनेत्याच्या गाडीची नंबर प्लेट धुसर केली आहे. मुंबई पोलिसांनी जाणीवपूर्वक कार्तिकच्या चित्रपटाचे नाव आणि संवाद सामान्य लोकांमध्ये जागृती करण्यासाठी वापरले आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यनचा शहजादा हा चित्रपट नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. कार्तिकने मुंबईतील सिद्धी विनायक मंदिरात जाऊन चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वादही घेतला. मात्र अभिनेत्याने मंदिराच्या कार पार्किंगच्या चुकीच्या बाजूला कार पार्क केली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अभिनेत्याच्या गाडीचे चलान कापले आहे.