कार्तिक आर्यनला सतावते या गोष्टीची भीती, करीअरब...

कार्तिक आर्यनला सतावते या गोष्टीची भीती, करीअरबाबतीत अभिनेत्याने केले मोठे विधान (Kartik Aaryan is Troubled due to Fear of This Thing, Actor Said Such a Big Thing About His Career)

‘भूल भुलैया 2’ च्या यशानंतर कार्तिक आर्यनच्या यशाची गाडी सुसाट सुटली आहे. एकीकडे आमिर खान आणि अक्षय कुमार सारख्या सुपरस्टारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असताना दुसरीकडे कार्तिक आर्यनसारखा नवोदित अभिनेता सातत्याने यशाच्या पायऱ्या चढत आहे. कार्तिक आर्यन या यशाने खूश असला तरी पण कुठेतरी तो इंडस्ट्रीत आऊटसाइडर असल्याची भीती त्याला सतावत आहे. एक आऊटसाइडर असल्याने कार्तिकलाही आपल्या करीअरची चिंता आहे.

सध्या कार्तिक आर्यन चार मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, पण सध्या मोठमोठ्या सुपरस्टार्सचे सिनेमे फ्लॉप होत असलेले पाहून कार्तिक आर्यनवरही कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा कायम राखण्याचे दडपण आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिक आर्यनने सांगितले की, जर माझा एकजरी  चित्रपट फ्लॉप झाला असता तर माझी मातीमोल झाली असती कारण मला इंडस्ट्रीत कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही.

आऊटसाइडर असल्याबद्दल, अभिनेता म्हणाला की मला इंडस्ट्रीत पाठिंबा देणारे कोणी नाही. इथे मला साथ देणारे कोणी नाही. मला माहित नाही की एखाद्या इनसाइडर, स्टार किडला कसे वाटेल, पण एक आऊटसाइडर असल्याने मला वाटते की माझा एकही चित्रपट फ्लॉप झाला तर तो माझ्या करिअरला उद्ध्वस्त करू शकेल.

मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, इंडस्ट्रीत आऊटसाइडर असल्याने माझ्या करीअरला फ्लॉप देणे खूप धोक्याचे असू शकते. कार्तिक आर्यनने इंजिनियरींगचे शिक्षण घेतले आहे, परंतु अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने इंजिनियरींग सोडून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. कार्तिकने 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर ‘प्यार का पंचनामा 2’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सारख्या चित्रपटांनी त्याला मोठ्या स्टार बनवले.

आऊटसाइडर असल्यामुळे कार्तिकला आपल्या करिअरची चिंता असली, तरी त्याला आपण पाहिलेली स्वप्ने एक एक करून पूर्ण होत असल्याचा आनंदही आहे. अभिनेता होण्यापासून ते लॅम्बोर्गिनी कार घेण्यापर्यंत कार्तिकचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता आपल्याकडे एक खाजगी जेट देखील असावे अशी त्याची इच्छा आहे. आणि ही इच्छा देखील तो लवकरच पूर्ण करेल.

कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत.लवकरच तो ‘शेहजादा’, ‘फ्रेडी’ आणि ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे. इतकेच नाही तर या चित्रपटांव्यतिरिक्त तो कबीर खानच्या एका चित्रपटात आणि हंसल मेहताच्या ‘कॅप्टन इंडिया’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.