स्ट्रगलिंगचे दिवस आठवून भावूक झाला कार्तिक आर्य...

स्ट्रगलिंगचे दिवस आठवून भावूक झाला कार्तिक आर्यन (Karthik Aryan’s Film Journey Was Difficult, Karthik Became Emotional Remembering The Days Of Struggle)

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये कार्तिक आर्यनचे नाव हमखास येते. सध्या त्याच्या चाहत्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. इंडस्ट्रीत कोणीही पाठीशी नसताना त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण कार्तिकच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तो चित्रपटांमध्ये सक्रिय होता पण लोक त्याला ओळखायचे नाहीत. याचा खुलासा खुद्द कार्तिकने केला आहे.

2022 मध्ये बॉक्स ऑफिसने कार्तिकच्या नावावर कमाई केली असे म्हटल्यास हरकत नाही. सध्या तो अनेक निर्मात्यांची पहिली पसंती बनला आहे. पण कार्तिकच्या या यशामागचा प्रवास खूपच खडतर होता. कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत त्याचे स्ट्रगलचे दिवस आठवत आपली व्यथा मांडली. त्याने सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा इंडस्ट्रीतील लोक त्याला ओळखत नव्हते. किंबहुना त्याचे नावही कोणाला माहीत नव्हते.

मुंबईतील आपल्या संघर्षाबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला की, माझा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मी अपयशाची चव चाखली आहे. माझ्यासाठी एकमात्र सकारात्मक गोष्ट म्हणजे वयाच्या 20 व्या वर्षी माझी कारकीर्द सुरू झाली. मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. मात्र, माझ्या करीअरमध्ये अनेक चढ-उतार आले. ‘प्यार का पंचनामा’ सारखा हिट चित्रपट करूनही लोक माझ्याकडे दुर्लक्ष करायचे. पण नंतर नशिबाने असे वळण घेतले की आज कार्तिक आर्यनला बॉलिवूडचा सुपरस्टार मानले जाते.

कार्तिकने असेही सांगितले की, जेव्हा मी एखाद्या प्रोजेक्टसाठी ऑडिशनला जायचो तेव्हा माझा चेहरा पाहून लोक मला हाकलून देत असत. काहीही बोलू न देता. सरळ अनफिट असे म्हटले जायचे. तेव्हा केवळ बोलण्याची एक संधी तरी मिळावी अशी इच्छा असायची.’

कार्तिकने 2011 मध्ये प्यार का पंचनामा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘सोनू के टीटू की स्वीटी’या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली.