कधी काळी कार्तिक आर्यन लिफ्ट मागून जायचा बॉलिवू...

कधी काळी कार्तिक आर्यन लिफ्ट मागून जायचा बॉलिवूडच्या इव्हेंटला, पहिली गाडी साठ हजाराला केली होती खरेदी (Karthik Aryan Used To Go Bollywood Parties After Asking For A Lift, Bought The First Car For This Amount)

अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. पण कार्तिक आर्यनच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा त्याच्याकडे चित्रपट असूनही त्याला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्यावेळी तर तो कोणत्याही इव्हेंटला जाण्यासाठी रिक्षाचा वापर करायचा.

कार्तिक आर्यन हा सध्याचा बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता बनला आहे. त्याचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहेत. सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांवर बहिष्काराची मागणी केली जात असताना कार्तिक आर्यनचे चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवत आहेत. ‘प्यार का पंचनामा’ या कार्तिकच्या पहिल्या चित्रपटाने चांगले यश मिळवले होते, परंतु त्यावेळी त्याला मिळालेले पैसे हे एक महागडी गाडी घेण्याइतके पुरेसे नव्हते. यासंदर्भातील खुलासा स्वतः कार्तिकने एका मुलाखतीत केला आहे.

कार्तिक आर्यन म्हणाला, ‘जेव्हा मी पहिल्यांदा इंडस्ट्रीत आलो तेव्हा माझ्याकडे कार नव्हती. दोन चित्रपट केल्यानंतर मी पहिली कार घेतली, तीही 60 हजार रुपये किंमतीची थर्ड हॅण्ड कार. ती विकत घेतानाही मला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या गाडीचा दरवाजासुद्धा खराब होता.

कार्तिक आर्यन म्हणाला की, “त्यावेळी माझ्यासोबत काय घडत आहे हे मला कळत नव्हते, पण त्या गाडीचा दरवाजाही उघडला जात नव्हता आणि ती नीट चालतही नव्हती. पावसाळ्यात तर ड्रायव्हरच्या सीटच्या इथेच गाडी गळायची. पण या सगळ्या गोष्टींची मला सवय झाली. मला वाटले की कोणाकडून तरी लिफ्ट घेण्यापेक्षा हे चांगले आहे.” त्या कारच्या समस्येने मी इतका कंटाळलो की इच्छा नसतानाही रेड कार्पेट इव्हेंटमध्ये मी रिक्षा, बाईक किंवा लोकांकडून लिफ्ट घेऊन जायचो.

कार्तिकने कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले होते की, संघर्षाच्या काळात एका अपार्टमेंटमध्ये आम्ही १२ लोक एकत्र राहत होतो. त्या सर्वांसाठी मी जेवण बनवायचो. त्यासाठी मी सर्वांकडून पैसे घेत होतो.

सध्या कार्तिककडे भारतातील पहिली McLaren GT ही महागडी कार आहे. या कारची किंमत 3.73 कोटी रुपयांहून अधिक आहे. याव्यतिरिक्त कार्तिककडे  ब्रिटिश रेसिंग ग्रीन कन्वर्टिबल मिनी कूपर सुद्धा आहे.