कार्तिक आर्यनने नाकारली 9 कोटींची ऑफर, कशासाठी ...

कार्तिक आर्यनने नाकारली 9 कोटींची ऑफर, कशासाठी मिळणार होती एवढी मोठी रक्कम? (Karthik Aryan Turned Down The Offer Of 9 Crores, Not The Film But Was Getting The Price For It)

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. अनेक बड्या स्टार्सचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असताना कार्तिकचे सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहेत. त्यामुळे त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू खूप वाढली आहे. कार्तिकला सध्या चित्रपटांच्या ऑफर्ससोबतच अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी अॅम्बेसेडर बनवायच्या ऑफरसुद्धा येत आहेत. मात्र कार्तिकने अशाच एका मोठ्या ऑफरला नकार दिला आहे. त्या ऑफरमध्ये त्याला 9 कोटी रुपये मिळणार होते.

कार्तिक आर्यन नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी कार्यरत असतो. मात्र एखादी ऑफर आपल्या चाहत्यांच्या जीवाशी खेळणारी असेल तर तो ती कशी काय स्विकारेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनने पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी 9 कोटी रुपयांची ऑफर नाकारली आहे. काही मिनिटांच्या जाहिरातीसाठी कार्तिकला 9 कोटी रुपये मिळणार होते. मात्र त्याने ती आपल्या चाहत्यांच्या आरोग्याचा विचार करुन नाकारली.

कार्तिकच्या या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर कार्तिकच्या चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील काही सेलिब्रेटी सु्द्धा कार्तिकच्या निर्णयाची प्रशंसा करत आहेत. सेन्सॉर बोर्डचे माजी चेअरमन पहलाज निहलानी यांनी सुद्धा कार्तिकचे कौतुक केले.

इंडस्ट्रीतील अनेकांनी पानमसाल्याची जाहिरात नाकारली असली तर ज्यांनी त्या जाहिरातीत काम केले त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. यामध्ये अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांचा समावेश आहे. याशिवाय यात बिग बी अमिताभ बच्चन देखील होते. तेव्हा त्यांना सुद्धा प्रेक्षकांनी खूप ट्रोल केले होते.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या कार्तिक आर्यनने 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून करीअरला सुरुवात केली होती. कार्तिकच्या पाठीशी बॉलिवूडमधला कोणताच वारसा नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याला फारसे काम कोणी द्यायचे नाही. मात्र जिद्द न हरता स्वत:च्या हिंमतीवर त्याने इंडस्ट्रीतील आपले स्थान पक्के केले.