करिश्मा कपूरने या सुंदर फोटोंनी जागविल्या आजी-आ...

करिश्मा कपूरने या सुंदर फोटोंनी जागविल्या आजी-आजोबांच्या गोड आठवणी : राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे अप्रकाशित फोटो प्रसिद्ध केले (Karisma Kapoor Shares Rare & Unseen Picture Of Her Grandparents Dada Raj Kapoor & Dadi Krishna Raj Kapoor)

आपले करिअर ऐन बहरात असताना करिश्मा कपूरने बॉलिवूड सोडले. पण ज्या लग्नासाठी तिने हा त्याग केला, ते लग्न काही टिकले नाही. म्हणून करिश्माने बॉलिवूडमध्ये पुर्नप्रवेश केला, पण तिला पूर्वीचे यश लाभले नाही. त्यामुळे ती सोशल मीडियावर बागडत असते. इथे तिचे चाहते बरेच आहेत.

त्यानुसार करिश्माने इन्स्टा स्टोरीवर आपले आजोबा राज कपूर व आजी कृष्णा राज कपूर यांचा ऐन तारुण्यातला अतिशय गोड फोटो प्रसिद्ध केला आहे. त्या काळानुसार हा फोटो ब्लॅक ॲन्ड व्हाईट आहे. त्यावर दादा-दादी असं लिहिलं असून हार्टचा इमोजी तिने टाकला आहे.

चाहत्यांना हा फोटो खूपच आवडला असून त्यांनी शक्यता वर्तविली आहे की, करिश्माला नक्कीच आपल्या आजोबा-आजीची आठवण येत असावी.

फोटोमध्ये राज कपूर व त्याची पत्नी अतिशय छान दिसत आहेत.

करिश्मा वेळोवेळी असे स्मृती जागवणारे फोटो पोस्ट करत असते. असे अप्रकाशित आणि दुर्मिळ फोटो पाहण्यात चाहत्यांना चांगलाच रस असतो.

करिश्माच्या मांडीवर चिमुकली करीना

‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाच्या वेळचा हा फोटो आहे.

नव्वदीच्या दशकातला आपला एक फोटो करिश्माने पोस्ट केला होता.

Photo Courtesy: Instagram (All Photos)