करीना दुसऱ्यांदा आई झाल्याच...

करीना दुसऱ्यांदा आई झाल्याच्या आनंदात करिश्मा मावशीने शेअर केला हा फोटो (Karisma Kapoor Shares An Unseen Picture Of Her Sister Kareena Kapoor)

करीना कपूर खान पुन्हा एकदा आई झालीय. सैफ अली खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘इस्ट अ बॉय’ अशी पोस्ट करत चाहत्यांना ही खुशखबर दिली. त्यांनतर चाहत्यांबरोबरच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी करीना आणि सैफला शुभेच्छा दिल्या आहेत.

करिश्मा कपूर ने शेअर केला न्यू बॉर्न करीनाचा न पाहिलेला फोटो
कपूर परिवारातील लाडकी मुलगी आणि पटौडींची लाडकी सून करीना कपूरने आज दुसऱ्यांदा आई बनून एका मुलाला जन्म दिला आहे. या आंनदाच्या क्षणी दोन्ही परिवारातील सदस्यांनी एकमेकांना अनेक शुभेच्छा दिल्या. तर करीना कपूरची बहीण अभिनेत्री करिश्मा कपूरनेही काहीशा वेगळ्या तऱ्हेने आपल्या लाडक्या बेबोला शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला आहे. तिने करीनाच्या जन्माच्या वेळचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. हा माझ्या बहिणीचा फोटो आहे जेव्हा तिचा जन्म झाला होता; आता ती पुन्हा आई झालीय आणि मी पुन्हा एकदा मावशी झालेय, असं म्हणत करिश्माने आपला आनंद व्यक्त केला आहे.

करीनाची चुलत बहीण रिद्धीमा कपूर साहनीने देखील करिनाला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि तिनेही स्वतःच्या इन्स्टाग्रामवर करीना आणि करिश्मासोबतचा स्वतःचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

सैफ अली खानची बहीण सबा अली खानने देखील आत्या झाल्याचा आनंद व्यक्त करताना आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात करीना, सैफ आणि तैमुर दिसत आहे. या फोटोसोबत सबाने कॅप्शन लिहिली आहे – ‘अपने अनमोल बच्चे के जन्म पर जश्न मना रहे हैं. बधाई!’

करिश्मा आणि करीना दोहोंचं अतिशय प्रेमळ व मैत्रीचं नातं

कपूर परिवारातील करिश्मा व करीना या दोन्ही बहिणींमध्ये अतिशय प्रेमाचं नातं आहे. करिश्मा तर आपल्या बहिणीला मुलीप्रमाणे जपते आणि तिला स्वतःची लाइफ लाइन म्हणते. करिनाही आपल्या मोठ्या बहिणीवर जिवापाड प्रेम करते. या दोघी बहिणी नेहमी चांगल्या मैत्रिणींप्रमाणे राहतात. यांच्या गर्ल गँगमध्ये मलाइका अरोडा आणि अमृता अरोडा देखील सहभागी आहेत. या चौघी मैत्रिणी नेहमी एकत्र दिसतात आणि एकत्र मजामस्ती करतात. या चौघी एकमेकांच्या संपर्कात असून सोशल मीडियावर आपले फोटो पाठवत असतात.
करिश्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये वडिल रणधीर कपूर यांच्या शेजारी करिश्मा उभी आहे तर त्यांच्या हातात लहानगी करीना दिसतेय. या फोटोत करिश्माच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत आहे. या आधी देखील करिश्माने त्यांच्या लहानपणीचा फोटो पोस्ट करून करीनाला शुभेच्छा दिल्या होत्या.
करिश्मा कपूर बरेचदा कपूर कुटुंबाचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आजही दुसऱ्यांदा मावशी झाल्यानंतरचा आपला आनंद व्यक्त करण्यासाठीच तिने हा स्पेशल फोटो शेअर केला आहे.

आज २१ फेब्रुवारी २०२१ रोजी करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. करीनाला दुसऱ्यांदा आई झाल्याबद्दल अनेक शुभेच्छा!

आणखी वाचा – दुसऱ्यांचा संसार मोडून, स्वतःचा संसार थाटणाऱ्या अभिनेत्री