‘करिश्मा का करिश्मा’फेम बालकलाकार अभिनेत्री झनक...

‘करिश्मा का करिश्मा’फेम बालकलाकार अभिनेत्री झनक शुक्लाचा पार पडला साखरपुडा(‘Karishma Ka Karishma’ Fame Child Actor Jhanak Shukla Gets Engaged, See Photos)

एकेकाळची सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही मालिका ‘करिश्मा का करिश्मा’ आणि ब्लॉक बस्टर चित्रपट ‘कल हो ना हो मधील  बालकलाकार झनक शुक्लाने आपला दीर्घकालीन बॉयफ्रेंड स्वप्नील सूर्यवंशीसोबत साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूडचा सुपर डुपर हिट चित्रपट ‘कल हो ना हो’ आणि काही वर्षांपुर्वीची सर्वात लोकप्रिय टीव्ही मालिका करिश्मा का करिश्मामधील बालकलाकार आता मोठी झाली आहे. अभिनेत्रीने स्वप्नील सूर्यवंशीसोबत साखरपुडा केला आहे. त्यावेळी अभिनेत्री अगदी साध्या लूकमध्ये दिसली.

अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. झनकची आई आणि अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांनीही आपल्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत झनकने लिहिले – अखेर आता अधिकृत साखरपुडा पूर्ण झाला आहे. झनक शुक्लाचा बॉयफ्रेंड स्वप्नील फिटनेस ट्रेनर आहे.साखरपुड्याचे हे फोटो झनकच्या घरातील आहेत. त्यांचा साखरपुडा झनकच्या घरी अगदी साधेपणाने पार पडला.

या फोटोंमध्ये झनक आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या म्हणजेच स्वप्नीलच्या शेजारी बसलेली आहे या सोहळ्यादरम्यान झनक गुलाबी सलवार-सूट आणि पिवळ्या दुपट्ट्यात दिसली. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने कुर्ता-पायजमा घातला होता.

झनकच्या या फोटोंवर सेलेब्सपासून चाहत्यांचे अभिनंदनाचे मेसेज येत आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुप्रिया शुक्ला हिनेही आपल्या इन्स्टाग्रामवर मुलीच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

सुप्रिया शुक्लाच्या अनेक सहकलाकारांनी म्हणजेच सृती झा, कंवर ढिल्लन, मोहित हिरानंदानी आणि अविका गोर यांनी तिच्या मुलीच्या साखरपुड्याबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.