आलिया भट्टने घातलेल्या पारदर्शक टॉप वर तिची नणं...

आलिया भट्टने घातलेल्या पारदर्शक टॉप वर तिची नणंद करीना कपूरची लक्षवे्धी कमेंट (Karina kapoor’s stunning Comment On Alia Bhatt Wearing The Transperent Top)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काही महिन्यांपूर्वीच रणबीर आणि ती आईबाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर सांगितली होती. तेव्हापासून आलिया तिच्या गरोदरपणामुळे सतत चर्चेत असते. अशातच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहे.

यासाठी ती आणि रणबीर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावून ब्रह्मास्त्र चित्रपटाचे प्रमोशन करत असतात. या प्रमोशन वेळी आलियाचे वेगवेगळे लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अलीकडेच आलियाने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती आपल्या बेबी बंपचे प्रदर्शन करताना दिसत आहे.
फोटोंमध्ये आलियाने गुलाबी रंगाचा पारदर्शक टॉप घातला होता आणि त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. तसेच लूज काळ्या रंगाची पॅण्ट घातली होती. आलियाच्या त्या टॉपमधून तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत होते.
रणबीरने निळ्या रंगाचे टिशर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातली होती. आलियाच्या या फोटोंना अवघ्या काही मिनिटांतच तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या.


आलियाच्या या नव्या फोटोंवर अनेक जणांनी कमेंट केली आहे. या सगळ्या कमेंटमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेते ती आलियाची नणंद करीना कपूर खानची कमेंट. कमेंटमध्ये करीनाने आलियाला माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला जे हवं ते मिळवलंच. इतकं सुंदर कसं कोण दिसू शकतं असे म्हटले आहे. याशिवाय करीना कपूर खानची नणंद आलियाच्या फोटोंवर स्टनिंग अशी कमेंट केली आहे.