करीनाने शेयर केले तैमूर आणि इनायाचे फोटोः चाहते...

करीनाने शेयर केले तैमूर आणि इनायाचे फोटोः चाहते झाले फिदा (Kareena shares Pics of Taimur aur Inaya; Fans Loved it)

करीना कूपर खान आपल्या सोशल अकाऊंटवर नेहमीच ॲक्टिव्ह असते. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे आणि आपल्या गरोदरपणाचे अनेक फोटो आणि अनुभव वेळोवेळी तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यावेळेस करीनाने आपल्या नवीन घरात तैमूर आणि इनाया यांचा एकत्र बसलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तैमूर आणि इनाया दोघं स्विमींग पूलमधून खेळून आल्यानंतर डायनिंग टेबलवर बसून क्यूट स्माइल देत आहेत, आणि त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर सैफ अली खान आणि कुणाल खेमू एकमेकांशी बोलत असलेलेही दिसत आहेत. या फोटोसाठी करीनाने असे लिहिले की, ”दोघं एकमेकांसोबत खूप ॲमेजिंग दिसत आहेत, नाही का?” त्याबरोबर करीनाने त्यांना हॅश टॅग करत टीम आणि इन्नी असंही लिहिलं आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

सोहा अली खान आणि कुणाल खेमू आपली मुलगी इनायासह करीनाच्या नवीन घरी फॅमिली टाईम घालवण्याकरिता गेले होते. करीनाने दोघांचे फोटो शेअर करताच त्यांच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊसच पडला. चाहत्यांकडून अनेक मेसेजही पाठवले गेले. तैमूर अली खानच्या चाहत्यांची लिस्ट फार मोठी असली तरी इनायादेखील फोटोग्राफर्सची खास आवड आहे. दोहोंच्या फोटोंना भरपूर लाईक्स मिळतात. करीनाला बाळंतपणासाठी या महिन्याची तारीख दिलेली आहे. ती आपल्या गरोदरपणाचे फोटो वरचेवर इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असते.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

करीनाला आपण कधी बाळंत होतोय असं झालं आहे. शेवटचा महिना असल्याने ती कधी नर्व्हस तर कधी स्ट्राँग दिसते. करीनाप्रमाणेच, तिचे चाहते आणि कुटुंबिय त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या प्रतिक्षेत आहेत. करीना आणि सैफ आपल्या बाळाला विरुष्काप्रमाणे मीडियापासून दूर ठेवतील की आपल्या बाळाचे फोटो शेअर करतील ते पाहूया.