करीना कपूरने प्रसिद्ध केले गणेश पुजनाचे फोटो; त...
करीना कपूरने प्रसिद्ध केले गणेश पुजनाचे फोटो; तैमूरने स्वतः बनवली गणेश मूर्ती (Kareena Shares Ganesh Pooja Pics, Taimur’s Self Made Idol Caught All Attention)

By Anita Bagwe in मनोरंजन
देशभरातून गणेश पुजनाच्या वार्ता झळकल्या आहेत. परंतु करीना कपूरने आपल्या घरच्या गणपतीचे जे फोटो शेअर केले आहेत, त्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

सैफ अली खान व करीना आणि तैमुरचे हे फोटो वेगाने इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

एका फोटोत करीना, सैफ आणि तैमुरसह गणपतीची पूजा करताना दिसते आहे. दुसऱ्या फोटोत सैफ आणि तैमुर हात जोडून उभे आहेत. परंतु तैमुरने स्वतःच्या हाताने क्ले ने बनविलेल्या गणपतीचा फोटो सर्वात लक्षवेधी आहे. तैमुरने बनविलेल्या क्लेच्या छोट्याशा गणपतीची लोक प्रशंसा करत आहेत.

गेल्या वर्षी लहानग्या तैमुरने खेळण्यांचा गणपती बनवला होता. तेव्हा देखील त्याच्या या गणपतीची सोशल मीडियावर वारेमाप स्तुती झाली होती.

